कळवण तालुक्यातील ग्रामसेवकांनी जपली बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:11 AM2021-06-20T04:11:03+5:302021-06-20T04:11:03+5:30
कळवण : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीन व इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध ...
कळवण : तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन मशीन व इतर आवश्यक साधनसामग्री उपलब्ध व्हावी म्हणून कळवण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने चार लाख रुपयांचा निधी संकलन करून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व गटविकास अधिकारी डी. ई. जाधव यांच्याकडे तो सुपुर्द केला. त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्याकडे धनादेश प्रदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
आमदार नितीन पवार यांनी कळवण मतदार संघातील विविध संघटनांना कोविड सेंटर विविध साधनसामग्रीसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन यापूर्वी कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शिक्षक, अधीक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ११ लाख ११ हजार रुपये, तर कळवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख ३१ हजार रुपयांची यापूर्वी मदत केली आहे. आमदार पवार यांच्या आवाहनाला व कळवण तालुक्यात दौऱ्यावर आलेल्या खासदार डॉ. भारती पवार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीदेखील केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे , सचिव रामू महाजन, उपाध्यक्ष भावराव ठाकरे, सुधाकर देशमुख, मीना भोये यांनी ग्रामसेवकांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करून निधी संकलनासाठी पुढाकार घेऊन चार लाख रुपयांचा निधी संकलित केला. त्या निधीतून कोविड सेंटरला आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होणार असल्यामुळे आदिवासी भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे, सचिव रामू महाजन, उपाध्यक्ष भावराव ठाकरे, सुधाकर देशमुख, मीना भोये, राजेंद्र जाधव, पी. एस. खिल्लारी, एस. टी. पाटील, एम. बी. पवार, वैशाली देवरे, हेमलता पगार, मीरा पाटील, नारायण रामोले, फुला गावीत, गणेश भोई, विस्तार अधिकारी एस. डी. महाले, युवराज सोनवणे आदींसह ग्रामसेवक संघटनेचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.
कोट...
कोरोनाकाळातील सामाजिक दातृत्व समजून कळवण तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेने मोठा आदर्श घालून दिला आहे. गावपातळीवर कोरोनाविरोधाच्या लढाईत ग्रामसेवक यांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामपातळीवर ग्रामसेवकाचा मोठा प्रभाव असतो. त्याचा उपयोग करून ग्रामीण व आदिवासी भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी ग्रामसेवक प्रयत्नशील आहेत.
- रवींद्र परदेशी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक
कोट... कोरोनाच्या या संकटकाळात ग्रामसेवक संघटनेने जो निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याबद्दल त्यांचा ऋणी असून, या निधीचा कोविड काळात रुग्णांसाठी योग्य वापर केला जाईल.
- डॉ. सुधीर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी.
फोटो – १८ कळवण १
कळवण येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या हस्ते डॉ. सुधीर पाटील यांच्याकडे चार लाखांचा धनादेश सुपुर्द करताना रवींद्र ठाकरे, रामू महाजन आदी.
===Photopath===
180621\333118nsk_31_18062021_13.jpg
===Caption===
कळवण येथील पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या हस्ते डॉ. सुधीर पाटील यांच्याकडे चार लाखाचा धनादेश सुपूर्द करताना रवींद्र ठाकरे, रामू महाजन आदी.