महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:22+5:302021-01-23T04:15:22+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कृषी मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे कृषी मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतंर्गत जिल्हास्तरीय प्रचार व प्रसिद्धी मेळावा तसेच महिला मेळाव्याचे आयोजन शासकीय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, मालेगाव कॅम्प येथे करण्यात आले होते. त्यावेळी भुसे बोलत होते. कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, तालुक्यात अनेक ठिकाणी महिला शेतकरी दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, फलोत्पादन यामध्ये आपली भूमिका चोख पार पाडताना दिसतात. महिला पुरुषांपेक्षा अधिक मेहनती, व्यवहार आणि कार्यकुशल असूनही त्यांना मिळणारे दुय्यम स्थान ही खेदाची बाब आहे. ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता असून निदान ज्या महिला स्वत: जमीन धारक आहे त्यांच्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प तालुक्यात राबविण्याची संकल्पना मांडली. राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण अभियान या प्रकल्पात शेतीविषयक सर्व बाबींचा समावेश केला असून हा प्रकल्प शासनास मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. पौष्टिक तृणधान्य भित्तीपत्रकाचे अनावरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात लावण्यात आलेल्या स्टॉलवर माती नमुने तपासणी केंद्र, कांदा पेरणी यंत्र, मका सोलणी यंत्र, विकेल ते पिकेल स्टॉलचा समावेश होता. १४५ ग्रामपंचातीमध्ये बसविण्यात येणाऱ्या फलकांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात फलकांचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
इन्फो
योजनांमध्ये महिलांसाठी आरक्षण
कृषी विभागामार्फत राज्यामध्ये कमीत कमी २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असाव्यात अशा मार्गदर्शक सूचनेत बदल करण्यात आला असून राज्यात ६२ हजार शेतीशाळांच्या माध्यमातून ८ लाख शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती काळात राज्यशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून १० हजार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही भुसे यांनी सांगितले.
फोटो- २२ मालेगाव दादा भुसे-१
मालेगावी आयोजित महिला मेळाव्यात स्टॉलची पाहणी करताना कृषिमंत्री दादा भुसे.
===Photopath===
220121\22nsk_26_22012021_13.jpg
===Caption===
फोटो- २२ मालेगाव दादा भुसे-१मालेगावी आयोजित महिला मेळाव्यात स्टॉलची पाहणी करताना कृषिमंत्री दादा भुसे.