शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध: आमदार पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:12 PM2021-05-30T16:12:15+5:302021-05-31T00:40:02+5:30
मालेगाव: वस्तीशाळा शिक्षकांची जुनी सेवा लागू करणे हे आपले ध्येय आहे. त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.राज्यातील शिक्षकांच्या प्रत्येक समस्येसाठी सदैव कटीबद्ध असुन कोरोना काळ संपल्यानंतर सर्व प्रलंबित प्रश्नाबाबत मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल असे प्रतिपादन आमदार कपिल पाटील यांनी केले.

प्राथमिक शिक्षक भारतीच्या ऑनलाईन राज्य कार्यकारीणी सभेस आमदार पाटील बोलत होते. राज्याध्यक्ष नवनाथ गेंड अध्यक्षस्थानी होते. यावेळी माध्यमिकचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, राज्यात कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा नोकरीबाबत तात्काळ पाठपुरावा करण्यात येतील.सामाजिक बांधिलकीची जाण घट्ट करून
समाजोपयोगी प्रकल्प हाती घेण्यासह
प्रत्येक जिल्ह्यात साने गुरुजी यांच्या नावाने वाचनकक्ष सुरू करण्यात पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करून त्याआधारे शिक्षकांचे वेतन निश्चित करणेबाबत शासन आखत असलेल्या धोरणाला शिक्षक भारतीतर्फे विरोध करण्यात येईल असे सुभाष मोरे यांनी सांगितले.
नवनाथ गेंड यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेतला. राज्य कार्याध्यक्ष प्रकाश दाणे, महिला आघाडीच्या अध्यक्षा स्वाती बेंडभर, राज्य उपाध्यक्ष विनोद कडव, विजय खडके, किशोर कदम, राज्य संपर्कप्रमुख संतोष ताठे, नागपूर विभागाचे अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,नाशिक विभागाचे अध्यक्ष राजेंद्र दिघे,जिल्हाध्यक्ष दिपक दराडे,प्रकल्प पाटील,जहांगिर पटेल,मंगेश खराडे, विनोद पवार यांच्यासह अनेक राज्य पदाधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेतला. प्रास्ताविक राज्य सरचिटणीस भरत शेलार यांनी तर सुत्रसंचालन राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे यांनी केले.या आभासी सभेस राज्यातील सर्व जिल्ह्यातील राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित होते.