ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:30 AM2021-04-24T01:30:09+5:302021-04-24T01:31:26+5:30

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे संबंधित अधिकारी नाशिकमध्ये येऊनही त्यांचे जबाब न घेणाऱ्या पोलिसांनी मात्र झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Committee questioned the contractor on the oxygen issue | ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

ऑक्सिजनप्रकरणी ठेकेदाराला समितीची प्रश्नावली

Next
ठळक मुद्देपोलिसांचे लक्ष मात्र भलतीकडे जबाबदार सोडून डॉक्टरांना नोटिसा

नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी संबंधित कंपनीचे दोन अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्याच्या आधारे चौकशी केली जाणार आहे तर दुसरीकडे संबंधित अधिकारी नाशिकमध्ये येऊनही त्यांचे जबाब न घेणाऱ्या पोलिसांनी मात्र झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी ऑक्सिजन गळती झाली, यात तत्काळ  २२ तर नंतर दोन अशा २४ रुग्णांचा मृत्यू झाला 
आहे. महापालिकेने ऑक्सिजन
टाक्या बसवूननंतर दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचे एका कंपनीला दिले 
आहे. 
तायो निपॉन या मूळ जपानी कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यांचे कार्यालय पुणे येथे आहे. टाकी ३१ मार्च रोजी बसवल्यानंतर अवघ्या २१व्या दिवशी ही दुर्घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ होते किंवा नाही 
आणि कंपनीने कोणाची नियुक्ती केली हे स्पष्ट झाले नाही. महापालिकेला दोन स्थानिक पुरवठादारांचे तंत्रज्ञ पाठवून गळती थांबवावी लागली 
होती. 
 या घटनेनंतर तब्बल ४८ तासांनी कंपनीचे दोन अधिकारी शुक्रवारी (दि. २३) नाशिकमध्ये दाखल झाले. राज्य शासनाच्या वतीने या संदर्भात उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असल्याने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांची भेट 
घेतली. मात्र, त्यांची उत्तरे देण्याची पुरेशी तयारी नसल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांना प्रश्नावली दिली असून, त्या आधारे उत्तर देण्यास सांगितले आहे. 
दरम्यान, पोलीस दलाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ४८ तासांनी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची त्याचे जाबजबाब घेण्याऐवजी महापालिकेच्या डाॅक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मूळ जबाबदारी ठेकेदार कंपनीची असताना महापालिकेच्या डॉक्टरांना जाब जबाबासाठी बोलवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तंत्रज्ञ तातडीने नियुक्त करा
संबंधित ऑक्सिजन पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने एक तंत्रज्ञ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालय येथे दोन ऑक्सिजन टाक्या असून, त्यांची दिवसभरात तीन ते चार वेळा तपासणी करण्याचे आदेश जाधव यांनी दिले आहेत.
पोलीस पथक पुण्याला?
ऑक्सिजन गळतीप्रकरणी नाशिकमध्ये आलेल्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणा गाठू शकली नाही. आता अधिकाऱ्यांना जबाबासाठी नोटीस बजावायला खास पोलीस पथक पुणे येथे जाणार आहे.

Web Title: Committee questioned the contractor on the oxygen issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.