शालार्थ आयडीचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:17 AM2019-06-11T01:17:22+5:302019-06-11T01:18:05+5:30
सिन्नर : नाशिक विभागातील शालार्थ आयडीचा प्रश्न संपुष्टात येण्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना व अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करण्याचा निर्णय झाला. दोन आमदार, संघटनांतील शिक्षकांचे चार जिल्ह्यातून आठ प्रतिनिधींचा यात समावेश असेल. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासोबत झालेल्या पुणे येथील बैठकीत निर्णय झाल्याची माहिती मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली.

बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण संचालक दिनकर पाटील आदी उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातल्या मसावद तालुक्यातील थेपडे विद्यालयाच्या पराग पाटील या शिक्षकाने शालार्थ आयडी मिळत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. डॉ. तांबे यांनी याबाबतचे गांभीर्य शिक्षण विभागाला समजावण्यासाठी पुणे येथे बैठक घेतली. शेतकऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या आत्महत्या होतील, असा इशारा डॉ. तांबे यांनी अधिकाºयांना दिला.
शालार्थ आयडीबाबत तत्कालीन संचालक गंगाधर म्हमाणे यांनी सुनावणी घेतली आहे. त्या फाईल नवीन संचालकांना तपासता येणार नसून खाली पाठवत असल्याचे सोळंकी यांनी सांगताच आमदार तांबे यांनी आगीतून निघून फुफाट्यात पडण्यासारखा हा प्रकार असल्याचे सुनावले. विभागीय अध्यक्ष, उपसंचालकांना १८ जूनपर्यंत फाईल निकालात काढण्याच्या सूचना केल्या असून, आयडी देण्यासारखी स्थिती असणाºयांना त्वरित देण्याचे सांगितले असल्याचे सोळंकी म्हणाले. त्रुटी असल्यास त्वरित कळवाव्या, किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करावे, असेही सांगितल्याचे ते म्हणाले. कामाला गती येईल फाईल तपासणीसाठी संघटना मिळवून समांतर समिती नेमावी. त्यामुळे कामाला गती येईल. त्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल, असे डॉ. तांबे, सचिव देशमुख यांनी सांगितले. सोळंकी यांनी त्यास मंजुरी देत समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.