कडेकोट बंदोबस्तात समिती करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:03 AM2018-12-06T00:03:07+5:302018-12-06T00:06:47+5:30
नाशिक : पावसाअभावी खरिपाची झालेली हानी, भाजीपाल्यापाठोपाठ कांद्याचे दर कोसळले तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवालदिल शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, दुष्काळी दौºयावर येत असलेल्या केंद्र सरकारच्या समिती सदस्यांना रोषाला बळी पडावे लागू नये म्हणून पथकाचा दौरा पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे. समिती सदस्यांना बॉडीगार्ड पुरविण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.
नाशिक : पावसाअभावी खरिपाची झालेली हानी, भाजीपाल्यापाठोपाठ कांद्याचे दर कोसळले तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवालदिल शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, दुष्काळी दौºयावर येत असलेल्या केंद्र सरकारच्या समिती सदस्यांना रोषाला बळी पडावे लागू नये म्हणून पथकाचा दौरा पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे. समिती सदस्यांना बॉडीगार्ड पुरविण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिल्या आहेत.
केंद्र सरकारच्या समितीचा बुधवारपासून नाशिक विभागात दुष्काळी पाहणी दौरा सुरू झाला असून, गुरुवारी दुपारी चौघा सदस्यांच्या पथकाचे नाशिक जिल्ह्यात आगमन होणार आहे. तथापि, अलीकडेच कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकºयांमध्ये व्यक्त होणारा संताप व टोमॅटो, वांगे आदी भाजीपाल्याला उठाव नसल्यामुळे झालेले नुकसान पाहता सरकारविषयी मोठी नाराजी दिसत आहे.
राज्य सरकारने दुष्काळी परिस्थिती जाहीर करून महिन्याचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्ष शेतकºयाच्या हाती काहीच पडलेले नाही. या पथकाला पोलिसांचे ‘एस्कार्ट’ देण्यात येणार असून, संपूर्ण दौºयात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. शिवाय पथकातील प्रत्येक सदस्याला व्यक्तिगत बॉडीगार्ड नेमण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकाºयांना या समितीसाठी समन्वयक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. याशिवाय महसूल, कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास या खात्याचे वरिष्ठ अधिकारी या समितीच्या दिमतीला ठेवण्यात येतील तर ज्या गावाला समिती भेट देईल तेथील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांनी आवर्जून उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या समितीच्या पाहणी अहवालावरूनच केंद्र सरकार राज्य सरकारला दुष्काळासाठी आर्थिक मदत करणार असल्यामुळे या समितीसमोर दुष्काळाचे विदारक चित्र समोर यावे यासाठी तीव्र टंचाईचे गावे त्यांना पाहणीसाठी निवडण्यात आले आहेत.
अशी असेल बडदास्त
या पथकातील सदस्यांना काही कमी पडू नये याचीही पूरेपूर दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी समिती सदस्यांना वातानुकूलित वाहनाबरोबरच, अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेले विश्रामगृहातील सूट, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, दौरा कालावधीत लागणाºया सर्व बाबींची पूर्तता करून काहीही कमतरता भासणार नाही अशा अधिकाºयांना सूचना आहेत. याशिवाय पथकाचा जिल्ह्णाच्या सीमेवर प्रवेश ज्या ठिकाणी होईल तेथूनच जिल्ह्णातील सर्व समन्वयक अधिकारी त्यांच्या सोबत राहतील.
असा असेल समितीचा दौरा
केंद्रीय पथकाचे नाशिक जिल्ह्णात गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजता धुळ्याहून लळिंग येथे आगमन होणार असून, तेथून ते थेट मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथे भेट देतील. दुपारी साडेचार वाजता मेहुणे येथे भेट देऊन दुष्काळाचे सर्वेक्षण करतील व सायंकाळी सव्वा पाच वाजता मेहुणे येथून नाशिककडे रवाना होतील. रात्री शासकीय विश्रामगृहावर मुक्काम व शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता नाशिकहून मुंबईकडे प्रयाण करतील.
केंद्र सरकारची समिती दौºयावर येत असून, ते प्रत्यक्ष गावोगावच्या शेतकºयांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत. अशा वेळी शेतकºयांकडून रोष प्रकट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाहून राज्य सरकारने केंद्रीय पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत.