सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संधी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:09 AM2018-02-25T01:09:50+5:302018-02-25T01:10:22+5:30
यंदाचा अर्थसंकल्प कृषीसह विविध उद्योग व्यवसायांना चालना देणारा असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय खुले असल्याचे प्रतिपादन आर्थिक सल्लागार अश्विनी केळकर यांनी केले आहे.
नाशिक : यंदाचा अर्थसंकल्प कृषीसह विविध उद्योग व्यवसायांना चालना देणारा असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय खुले असल्याचे प्रतिपादन आर्थिक सल्लागार अश्विनी केळकर यांनी केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित ‘अर्थसंकल्प-२०१८’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सलील केळकर यांनीही नागरिकांना सुरक्षित गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन केले. केळकर म्हणाल्या केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योग व मध्यम स्वरूपांच्या उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी तरतुदी केल्या आहेत. त्याचप्रमाणे उद्योग व्यावसायिकांना आवश्यक पाठबळ उभे करण्यासाठी अर्थ पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजनाही आणल्या आहेत. त्यामुळे येणाºया काळात सर्वसामन्य गुंतवणूकदाराला अनेक चांगल्या संधी आहेत. परंतु, नागरिकांनी गुंतवणूक क रताना योजनेतील सर्व तरतुदी बारकाव्याने समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले, तर सलील केळकर यांनी उपस्थितांना गुंतवणुकीचे विविध प्रकार व योजनांविषयी माहिती दिली.