नाशिकच्या पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 05:40 PM2017-12-23T17:40:50+5:302017-12-23T17:44:19+5:30

Common seller of Nylon Manjhi in Panchavati of Nashik | नाशिकच्या पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

नाशिकच्या पंचवटीत नायलॉन मांजाची सर्रास विक्र ी

Next
ठळक मुद्देकारवाईची मागणी : प्रशासन अनभिज्ञ

नाशिक : नायलॉन मांजामुळे दरवर्षी अबालवृद्ध आणि पक्षी जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी पंचवटीत सर्रासपणे चोरी छुप्या पद्धतीने त्याची विक्र ी केली जात आहे. एकीकडे नायलॉन मांजा वापरू नका असे सुचविले जात असून दुसरीकडे पतंग व्यवसायिकांकडून सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्र ी करण्यात येत आहे.
नायलॉन मांजाची विक्र ी करणाºयांवर कारवाई केली जात असली तरी सध्या उघडपणे नायलॉन मांजा विक्र ी करणाºया व्यवसायिकांकडे दुर्लक्ष झाल्याने खरेदी विक्रीचे व्यवसाय वाढले आहेत. याबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे. मकरसंक्र ांतीला चार आठवडे शिल्लक असून तत्पुर्वीच पतंग व मांजा विक्र ीची दुकाने सज्ज झाली आहे.
पंचवटीसह मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया रविवार कारंजा, भद्रकाली या भागातील पतंग विक्र ेते नायलॉन मांजा विक्र ी करीत असल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे. नायलॉन मांजामुळे दरवर्षी झाडावर बसलेल्या पक्षांच्या पायात मांजा अडकतो आणि जखमी होऊन त्यातील बरेचसे पक्षी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनाही घडत आहेत. कधी रस्त्याने पायी अथवा दुचाकीवरून जातांना मांजा गळयाला, पायाला लागून अनेकजण जखमी होतात.
नायलॉन मांजामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने नायलॉन मांजावर बंदी घातली आहे मात्र ही बंदी केवळ नावालाच असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. प्रशासनाने रविवार कारंजा, भद्रकाली व पंचवटीसह शहर परिसरात पतंग गुदाम असलेल्या ठिकाणी छापा टाकून त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Web Title: Common seller of Nylon Manjhi in Panchavati of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.