अनुवादातून होते संस्कृतीची देवाण-घेवाण : हेमंत टकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:34 AM2017-10-25T00:34:25+5:302017-10-25T00:34:39+5:30
गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान अनुवादाच्या रूपाने होणारी साहित्याची देवाण-घेवाण मूल्यवर्धित वाचन संस्कृतीसाठी उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे या प्रक्रि येला निरंतर स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे मत कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी व्यक्त केले. मूळचे लखमापूर, ता. सटाणा येथील रहिवासी आणि बडोदा येथील वाड््:मय परिषदेचे ज्येष्ठ सदस्य संजय बच्छाव यांनी हर्षल पुष्कर्णा यांच्या गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘आ छे सिआचेन’ पुस्तकाचा मराठीत केलेल्या ‘हे आहे सियाचीन’ अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
इंदिरानगर : गुजरात आणि महाराष्ट्र दरम्यान अनुवादाच्या रूपाने होणारी साहित्याची देवाण-घेवाण मूल्यवर्धित वाचन संस्कृतीसाठी उत्साहवर्धक बाब आहे. त्यामुळे या प्रक्रि येला निरंतर स्थैर्य प्राप्त झाले पाहिजे, असे मत कुसुमाग्रज स्मारकाचे अध्यक्ष हेमंत टकले यांनी व्यक्त केले. मूळचे लखमापूर, ता. सटाणा येथील रहिवासी आणि बडोदा येथील वाड््:मय परिषदेचे ज्येष्ठ सदस्य संजय बच्छाव यांनी हर्षल पुष्कर्णा यांच्या गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘आ छे सिआचेन’ पुस्तकाचा मराठीत केलेल्या ‘हे आहे सियाचीन’ अनुवादाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
विनायक रानडे आणि मूळ लेखक हर्षल व्यासपीठावर उपस्थित होते. ग्रंथ तुमच्या दारी उपक्रमाद्वारे भारतासह जगभर हे पुस्तक पोहचविण्यात येईल, असे रानडे यांनी सांगितले. यावेळी ठाणे मनपाचे माजी नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ, दिलीप सोनवणे, डॉ. जयराज पाटील, जी. एफ. हिरे, भालचंद्र कोठावदे, ब्रिजकुमार परिहार, वंदना बच्छाव, रोहित हिरे, अर्चना बच्छाव, अनिमिष बच्छाव, प्रसन्ना बच्छाव, प्रा. सुश्रुती पाटील, ईश्वरी बच्छाव, फाल्गुनी पुष्करणा आदी उपस्थित होते. राजेंद्र बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.