जिल्ह्यात संचारबंदी अधिक कडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:49 AM2020-03-31T00:49:38+5:302020-03-31T00:49:50+5:30
नाशिक : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली.
नाशिक : ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्णात एक कोरोनाबाधित रु ग्ण आढळून आल्याने आता गावागावांत संचारबंदी अधिक कडक केली जाणार जाणार आहे, अशी माहिती जिल्ह्णाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दिली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अथवा वाहने वगळता कोणीही रस्त्यावर आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्णातील कुठल्याही गावांमध्ये कोणी परदेशवारीवरून आले असेल तर त्याची माहिती तत्काळ जिल्हा ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष किंवा आरोग्य विभागाला द्यावी, असेही आवाहन सिंह यांनी केले आहे. जिल्ह्णातील संचारबंदी कायद्याचे उल्लंघन आता खपवून घेतले जाणार नाही. जिल्ह्णाच्या सर्व सीमावर्ती नाक्यांवर तैनात अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्येक वाहन तपासण्याचे आदेश दिले गेले आहेत. केवळ दूध, भाजीपाला, औषधे, वृत्तपत्रे आदींची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संचारबंदीचे नियम शिथिल केले आहेत. याव्यतिरिक्त अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहनेही वगळण्यात आली आहे; मात्र अन्य कोणतेही वाहन रस्त्यावर आल्यास चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.