मुलांच्या सुयोग्य जडणघडणीसाठी संवाद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 01:12 AM2019-11-22T01:12:52+5:302019-11-22T01:14:26+5:30

सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.

Communication is essential for children's well-being | मुलांच्या सुयोग्य जडणघडणीसाठी संवाद आवश्यक

जितेंद्र मेटकर

googlenewsNext
ठळक मुद्देजितेंद्र मेटकर : सिन्नर येथे वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ वर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : आपल्या मुलांची सुयोग्य जडणघडण करण्यासाठी त्यांच्याशी संवाद केला पाहिजे. त्यांना वेळ दिला पाहिजे. चांगल्या वाईटातला फरक समजावून सांगितला पाहिजे. सात वर्षे वयापर्यंत मुलांवर असे संस्कार करण्याची नितांत गरज असून, त्यात कमतरता राहिल्यास मुलांच्या भवितव्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होतोे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी व सामाजिक विषयांचे अभ्यासक जितेंद्र मेटकर यांनी केले.
सिन्नर वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर मेटकर बोलत होते. स्व. अशोक वाजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनुराधा वाजे यांनी हा कार्यक्र म प्रायाोजित केला होता.
कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे भारतावर दीर्घकाळ राज्य करता येईल याचा ब्रिटिशांनी अभ्यास केला. ऐक्य, प्रामाणिकपणा, दिल्या शब्दाला जागण्याची वृत्ती, औदार्य हे सगळे भारतीयांच्या रक्तात भिनलेले गुण भेदले तरच आपल्याला राज्य करता येईल, असा निष्कर्ष लॉर्ड मेकॉले याने काढला. या गुणांचे मूळ भारतीय कुटुंब व्यवस्थेत असल्याने त्यावर आघात केला तरच हे शक्य असल्याने त्याने भारतीय शिक्षण पद्धतीच बदलून टाकली असे मेटकर यांनी सांगितले. या बाबत लॉर्ड मेकॉलेच्या बहिणीने त्यास पत्र पाठवून भारतावर राज्य करणे अशक्य असल्याचे सांगत आपल्यावरील संस्कारांचे दाखले दिले होते. मेकॉलेने बहिणीच्या पत्राला उत्तर देताना ‘तुझी भीती खरी आहे, मात्र मी शिक्षणपद्धतीच आमूलाग्र बदलून ऐक्यात फूट पाडून कुटुंब व्यवस्थाच उद्ध्वस्त करून टाकेन’ अशी ग्वाही बहिणीला दिली होती. ही दोन्ही पत्रे उपलब्ध असल्याचे मेटकर यांनी सांगितले.
वडील घरापासून दूर असतानाही उत्तम संस्कार करून आपल्या मुलांना कर्तबगारीच्या शिखरावर जाण्याची प्रेरणा देणाऱ्या मातांची संख्या आपल्या देशात कमी नाही. पती जवळ नसताना मुलांना घडविणारी पांडवांची माता कुंती, प्रभू रामचंद्रांच्या विरहात लव-कुशांना चक्रवर्ती स्थानावर नेणारी माता सीता, वडील दुष्यंतांच्या अनुपस्थितीत जनतेसाठी राज्य करून अमर झालेल्या राजा भरताची माता शकुंतला, सम्राट अशोकाची माता शुभद्रांगी आणि शहाजी राजे सोबत नसताना मुलास मराठी साम्राज्य उभे करण्याची शिकवण देणाºया माता जिजाऊ. या पाच मातांच्या कथा प्रत्येक मातेसाठी आदर्श आहेत. याची आठवण आई-वडिलांनी ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.
कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा. पालक चांगली पुस्तके वाचतील तरच मुलेही वाचतील कारण मुले अनुकरणप्रिय असतात. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी सद्वर्तन ठेवल्यास मुलेही सद्वर्तनी होतील असे ते म्हणाले.

फोटो : सिन्नर सार्वजनिक वाचनालयात ‘कुटुंब- एक संस्कार शाळा’ या विषयावर बोलताना जितेंद्र मेटकर. कुत्र्यांना बिस्कीट व मुलांनाही बिस्कीट व ब्रेड दिले जाऊ लागल्याने मुले आजारांच्या गर्तेत जात आहेत. लहानपणीच अनेक समस्यांनी त्यांना घेरले जात असून, बालवयातच चष्मा लागतो आहे. त्याला त्यांचा आहार-विहार कारणीभूत आहे. त्यासाठी मुलांना चांगल्या सवयी लावा. मैदानी खेळ व वाचनाची गोडी लावा.

Web Title: Communication is essential for children's well-being

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.