वडाळागाव परिसरातील समाजमंदिर बनले खंडहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 09:52 PM2020-07-20T21:52:03+5:302020-07-21T02:03:01+5:30
इंदिरानगर : वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.
इंदिरानगर : (संजय शहाणे) वडाळागाव परिसरातील घरकुल योजना लगत असलेले समाजमंदिर देखभालीअभावी खंडहर बनले आहे, याठिकाणी पावसाचे व गटारीचे पाणी साचले असून, घाणीमुळे परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे.
वडाळागावात सुमारे १५ हजार लोकांची वस्ती आहे, यामध्ये शेतकरी व हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. वडाळागाव, सादिकनगर, मेहबूबनगर, मुमताजनगर, गुलशननगर, अण्णा भाऊ साठेनगर, सह परिसरात सुमारे ७० टक्के हातावर काम करणारी लोकवस्ती म्हणून ओळखले जाते. सुमारे दहा वर्षांपूर्वी वडाळागावातील घरकुल योजनालगत सुमारे पंधरा लाख रुपये खर्च करून समाजमंदिर बांधण्यात आले. जेणेकरून परिसरातील नागरिकांना लहान-मोठे कार्यक्रम घेता येतील. त्यामुळे नागरिकांना आर्थिक त्रास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली होती. सुमारे दहा वर्षांपासून समाजमंदिराच्या देखभालीअभावी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चोरट्यांनी समाजमंदिराला असलेले लोखंडी ग्रील खिडक्या चोरून नेल्या. तसेच शौचालय बाथरूम व खोलीचे ही नुकसान केली आहे. तसेच समाजमंदिरात घाण व पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी निर्माण झाली असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजमंदिरात क्रिकेट आणि मद्यपींचा, गांजा पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. लाखो रु पये खर्च करून समाजमंदिराचा सदुपयोग होत नसेल तर समाजमंदिर बांधले कशाला? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
-------------------
डासांचा प्रादुर्भाव
समाजमंदिरालगत घरकुल योजना सुमारे ७२० कुटुंब वास्तव करीत आहेत. या परिसरात डास, किड्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तातडीने समाजमंदिराची दुरु स्ती करून संस्थेस देखभालीसाठी द्यावे, अशी मागणी वडाळागाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.