सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 06:03 PM2021-03-24T18:03:22+5:302021-03-24T18:21:47+5:30
नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.
नामपूर : आज महाराष्ट्र राज्यातील पहिली सामुदायिक शेतकरी आत्महत्येला ३५ वर्ष पूर्ण होत आहे, त्यांच्या व आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकरी बांधवांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने १ दिवसाचे अन्नत्याग आंदोलन नामपूर बाजार समितीच्या आवारात केले.
शासनाने शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष द्यावे म्हणून २०१७ पासून राज्यातील शेतकरी वर्ग १ दिवसाचा उपवास करतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी सामुदायिक उपवास करत आहेत. एक दिवस अन्नत्याग आंदोलन संपूर्ण राज्यात पोहोचेल आणि शासन दरबारी शेतकरी प्रश्न निकाली निघतील असा विश्वास शेतकरी पुत्रांना आहे, असे मत पगार यांनी व्यक्त केले आहे.
बाजार समिती सभापती संजय भामरे, संचालक भाऊसाहेब अहिरे, पोलीस पाटील बाळासाहेब ठाकरे, सचिन आहिरराव यांनी पाठिंबा दिला. सदर आंदोलनाला बागलाण तालुका माजी जवानांना पाठिंबा दिला आहे. परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी सदर अभिवादन स्थळी भेट दिली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद्भावना व्यक्ती केली. डिंगम्बर धोंडगे, हर्षल अहिरे, सुभाष शिंदे, रवींद्र धोंडगे, राहुल पगार, योगेश पगार, देविदास पगार, भाऊसाहेब पगार, शेखर कापडणीस यांनी सामुदायिक अन्नत्याग केला.
राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, कोणीही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये ही भावना मनात कायम आहे. एक जवान म्हणून अभिवादन करतांना खूप वेगळ्या भावना आहेत. ३५ वर्षांपूर्वी रावसाहेब करपे व मालती करपे यांनी ४ मुलांसह आत्महत्या केली. आज पण आत्महत्या सुरूच आहेत. या आत्महत्या शासनाने थांबवाव्यात व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सद्भावना निर्माण व्हावी म्हणून केलेल्या अन्नत्याग आंदोलनला आमच्या माजी जवानांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
- विश्वास पगार, माजी जवान. (२४ नामपूर १,२)