गुदामातील कंपनीच्या २१ लाखांच्या मालाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 05:28 PM2018-09-30T17:28:16+5:302018-09-30T17:28:53+5:30

नाशिक : गुदामात विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेल्या कंपनीच्या २१ लाख ६० हजार रुपयांच्या मालाचा अपहार करण्यात आल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रवीण अजय खोचे (रा़ नाशिक) याच्या विरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

The company's 21 lakhs cargo shipments | गुदामातील कंपनीच्या २१ लाखांच्या मालाचा अपहार

गुदामातील कंपनीच्या २१ लाखांच्या मालाचा अपहार

Next
ठळक मुद्दे२१ लाख ६० हजार रुपयांच्या मालाचा अपहार

नाशिक : गुदामात विश्वासाने ठेवण्यासाठी दिलेल्या कंपनीच्या २१ लाख ६० हजार रुपयांच्या मालाचा अपहार करण्यात आल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे़ या प्रकरणी संशयित प्रवीण अजय खोचे (रा़ नाशिक) याच्या विरोधात सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

सातपूर पोलीस ठाण्यात रविकांत चमाडिया (रा़ सुजलॉन कार्पोरेट आॅफिस, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इल्जिन ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे स्टेलनेस स्टीलचे एक्स़एल़ बेअरिंग मॉडेल नंबर २, डब्ल्यू.डी़ए.बी़एस़चे विविध पार्ट असा २१ लाख ६० हजार रुपयांचा माल २१ जुलै २०१८ ते २८ सप्टेंबर २०१८ या कालावधीत अशोक वाच्छानी यांचे मालकीच्या गुदामामध्ये ठेवण्यासाठी दिला होता़ सातपूर औद्योगिक वसाहतीत निवेक क्लबसमोर हे गुदाम असून त्यात ठेवलेला लाखो रुपयांच्या मालाचा संशयित प्रणव खोचे याने अपहार केला़

या प्रकरणी चमाडिया यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: The company's 21 lakhs cargo shipments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.