मागील वर्षीच्या तुलनेत यंदा त्र्यंबकला कोरोनाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 09:18 PM2021-04-04T21:18:36+5:302021-04-04T21:19:02+5:30

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा यंदाचा मार्च हा महिना कोरोनाच्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सद्यस्थिती कारोनाचे २०० रुग्ण झाले आहेत. तर तालुक्यात ५४ रुग्ण आहेत.

Compared to last year, Trimbakala Corona's havoc this year | मागील वर्षीच्या तुलनेत यंदा त्र्यंबकला कोरोनाचा कहर

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा त्र्यंबकला कोरोनाचा कहर

Next
ठळक मुद्देएकुण पॉझिटिव्ह ९३९

त्र्यंबकेश्वर : मार्च ते जुलै २०२० पेक्षा यंदाचा मार्च हा महिना कोरोनाच्या बाबतीत अधिक चिंताजनक बनला आहे. त्र्यंबकेश्वर शहरात सद्यस्थिती कारोनाचे २०० रुग्ण झाले आहेत. तर तालुक्यात ५४ रुग्ण आहेत.
एकुण पॉझिटिव्ह ९३९ असून यात नगर परिषद ४६३ व ग्रामीण ४७६ अशी वर्गवारी आहे.

६७२ रुग्ण बरे होवून घरी परतलेले आहेत. तर १७ जणांंचा मृत्यु झाला आहे. होम आयसोलेटेड मध्ये १३४ तर त्र्यंबकेश्वर शहरात २२५ व ग्रामीण ५४ अशी आकडेवारी आहे.
चौकट...

शहरात रुग्ण संख्या वाढण्याची कारण म्हणजे सध्या जनता कर्फ्यु असल्याने तुर्त मंदीर बंद आहे. पण एरवी त्र्यंबकेश्वर मंदीर खुलेच असते. हजारो यात्रेकरु त्र्यंबकमध्ये येत असतात. त्र्यंबकेश्वर मध्ये आल्यावर त्यांचा संपर्क पुजाविधी दर्शनाच्या खरेदी आदीच्या माध्यमातून निमित्ताने संबंधितांशी येतो. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला कोरोना बालकांची संख्या वाढली आहे. याचे कारण त्र्यंबकेश्वर शहर तिर्थक्षेत्र असल्याने भाविकांची गर्दी असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आता ४२७ आहे. तर नगरपरिषद हद्दीतील पॉझिटिव्ह रुग्ण आता ३६२ आहे. विशेष म्हणजे संपुर्ण तालुक्यातुन दररोज पॉझिटिव्ह होणारे रुग्ण २,३ असतात. तर त्र्यंबक शहरातील रुग्ण संख्या दररोज २०,२५ च्या संख्येने वाढत आहेत.

सिंहस्थाच्या वेळी बांधण्यात आलेल्या ट्रेकींग विश्राम गृह येथे कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आलेले आहे. येथे ३८ रुग्णांच्या कॉट्स फुल्ल झालेल्या आहेत.
रविवार पासुन गावातर्फे जनता कर्फ्यु आठ दिवस पाळण्यात आला.

तो कर्फ्यु संपतो कुठे नाही तो काल पालिका सभागृहात नगरसेवक व्यापारी असोसिएशन कापड विक्रेते अन्य व्यावसायिक यांची संयुक्त बैठक होउन पुनश्च आठवडाभर जनता कर्फ्युत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय दर शनीवारी रविवारी जिल्हा प्रशासनाने यापुर्वीच संचारबंदी लागु केलेली आहे. त्यात त्र्यंबकेश्वर मंदीरही बंद ठेवले जाते.

त्र्यंबकेश्वर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. यापुर्वी आठ दिवस व उद्यापासुन आठ दिवस जनता कर्फ्यु मुळे मंदीर बंद असल्याने कृपया भाविकांनीही दर्शनासाठी तुर्तास येउ नये. याशिवाय गावात जंतूनाशक फवारणी कन्टेन्मेन्ट झोन आदी कामे पालिका करत आहेत. मात्र अद्याप सफाई ठेका कुणाला न दिल्याने शक्य होईल तशी सफाई करुन घेत आहोत.
- संजय पाटील, मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर.

Web Title: Compared to last year, Trimbakala Corona's havoc this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.