गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:34 AM2018-06-23T00:34:49+5:302018-06-23T00:35:11+5:30
मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
नाशिक : मान्सूनचे आगमन झाले असले तरी, अद्याप जिल्ह्यात समाधानकारक हजेरी न लागल्याने बळीराजा धास्तावला आहे. यंदा हवामान खात्याने समाधानकारक पाऊस पडण्याचे संकेत दिले असले तरी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २२ जूनपर्यंत जिल्ह्णात ५.२७ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान दुपटीने पाऊस नोंदविला गेला होता. शुक्रवारी दुपारी जिल्ह्णातील काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाली. मालेगाव शहरात एका तासात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात अद्यापही दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, मालेगाव, कळवण, सुरगाणा, देवळा व निफाड या तालुक्यांमध्ये सरासरी २३ टक्के पाऊस झाला असून, त्यामुळे मे महिन्यातच लागवडीसाठी शेतीची मशागत करून बसलेल्या शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. विशेष म्हणजे, जून महिन्याच्या दमदार पावसाच्या भरवशावर भाताच्या आवणीला सुरुवात केली जाते. परंतु जूनचा शेवटचा आठवडा उजाडूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी न लावल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. १ जूनपासून जिल्ह्णात ८०१.७ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला असून, त्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात १७० व त्यानंतर येवला येथे ११२ मिलिमीटर झाली आहे. येवला येथे गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने तालुक्यात एका दिवसातच ४४ मिलिमीटरची नोंद करण्यात आली. त्यामानाने निफाड तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे फक्त ११ मिलिमीटर पाऊस गेल्या २० दिवसांत नोंदविला गेला आहे. १ ते २२ जून यादरम्यान पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता जून महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत ५३ टक्के दिसत असला तरी, गेल्या वर्षी याच दरम्यान जिल्ह्णात १६२१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती व त्याची टक्केवारी १०.७ इतकी होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्माच पाऊस झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्णातील नाशिकसह मालेगाव, सटाणा, दिंडोरी आदी भागांत पावसाने हजेरी लावली. मालेगाव शहरात दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह कोसळलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. एका तासात शहरात ७४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली. पावसाळी वातावरणामुळे हवेतील उकाडा कमी होण्यास मात्र मदत झाली.