तीन वर्षांच्या तुलनेत ध्वनी, वायुप्रदुषणात लक्षणीय घट!
By admin | Published: November 4, 2016 10:39 AM2016-11-04T10:39:25+5:302016-11-04T10:40:04+5:30
आरोग्यासह पर्यावरणास घातक असलेल्या फटाक्यांपासून दूर होत नाशिककरांनी यावर्षी ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याबाबत चांगलीच मदत केली.
दिवाळीत नागरिक झाले पर्यावरणस्नेही; वायुप्रदूषण कमी
विजय मोरे, ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. ४ - आरोग्यासह पर्यावरणास घातक असलेल्या फटाक्यांपासून दूर होत नाशिककरांनी यावर्षी ध्वनी व वायू प्रदूषण कमी करण्याबाबत चांगलीच मदत केल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे़ विशेष म्हणजे गत तीन वर्षांत ध्वनीमध्ये सुमारे ८ डेसीबलपर्यंत घट तर वायुप्रदूषणही कमी झाले आहे़
लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज असे तीन्ही दिवस मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले जात असल्यामुळे ध्वनी व वायुप्रदूषणात मोठी वाढ होते़ यामुळे मानवासह, पशू-पक्षी तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो़ हा परिणाम रोखण्यासाठी प्रसार माध्यमे, सामाजिक संस्था यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते़ यामुळे नागरिकांच्या मानसिकतेतील बदल हा पर्यावरणासाठी अनुकूल ठरतो आहे़
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत ध्वनी व हवेतील घातक वायुंची तपासणी केली जाते़ यंदा ३० आॅक्टोबर अर्थात लक्ष्मीपूजन ते १ नोव्हेंबर (पाडवा) या तीन दिवसांमध्ये केलेल्या ध्वनीचाचणीत सीबीएस व बिटको पॉईट परिसरात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण तर त्या खालोखाल पंचवटी, दहिपूल व सिडको परिसराचा समावेश आहे़ मात्र असे असले तरी ध्वनी प्रदूषणाची गत तीन वर्षांतील पातळी पाहता या पाचही परिसरांमध्ये दरवर्षी घट होत चालली आहे़
शहरात लक्ष्मीपूजनच्या दिवशी करण्यात आलेल्या वायुप्रदूषण मोजणीमध्ये नायट्रोजन डायआॅक्साईडचे प्रमाण हे सर्वाधिक अर्थात सरासरी ७२ मायक्रो ग्रॅम पर क्युबिक मीटर आढळून आले़ पाडव्याच्या दिवशी हवेमध्ये कार्बन मोनाक्साईडचे प्रमाण हे सर्वाधिक अर्थात सरासरी ७१ मायक्रो ग्रॅम पर क्युबिक मीटर तर भाऊबीजेच्या दिवशी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ओ ३ (ओझोन) ची आकडेवारी सरासरी ८५ पर्यंत पोहोचल्याचे आढळून आले़ महाराष्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार ५१ ते १०० टक्क्यापर्यंतचे प्रदूषण हे तीव्र स्वरूपाचे नसले तरी त्याचा लहान मुले व श्वसनविकार असणाऱ्यांवर घातक परियाम होत असतो़
एकंरीतच नाशिककरांनी यंदाची दिवाळी पर्यावरणपुरक पद्धतीने साजरी केल्यामुळे ध्वनी व वायूप्रदूषणात घट झाल्याचे चित्र आहे़
हवेत नायट्रोजन व कार्बनचे प्रमाण अधिक
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या केटीएचएम महाविद्यालय केंद्रातर्फे दिवाळीच्या तीन दिवसांमधील वायूप्रदूषण नोंदविण्यात आले़ त्यामध्ये लक्ष्मीपूजन (दि़३०), पाडवा (दि़३१) व भाऊबीज (०१) या तीन दिवसांमध्ये प्रथम दिवशी नायट्रोजन डायआॅक्साईड (७२), कार्बन मोनॉक्साईड (७१), ओझोन (८५) अधिक असल्याचे आढळून आले आहे़
सामाजिक संस्था, प्रसारमाध्यमे यांच्याकडून शाळा, महाविद्यालये तसेच नागरिकांमध्ये ध्वनी व वायुप्रदूषणातची जनजागृती करण्यात आली होती़ तसेच दिवसेंदिवस पर्यावरणाप्रती होणारी जनजागृतीमुळे गतवर्षीच्या दिवाळी सणाच्या तुलनेत यावर्षी ध्वनी व वायुप्रदूषणात घट झाली आहे़ महाराष्ट्र प्रदूषण व नियंत्रण मंडळांच्या संकेतस्थळावर सदर आकडेवारी प्रसिद्धही करण्यात आली आहे़
- राजेंद्र पाटील, विभागीय प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक़
लक्ष्मीपूजनच्या दिवशी झालेले(दि़३०) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)
हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरी
पीएम १० (धुलीकण) १७ ४६ ३१
एसओ-२ (सल्फर) ०१ ८४ १३
एनओ-२ (नायट्रोजन) ४० १५१ ७२
पीएम २़५ (धुलीकण) १८ ९६ ४०
सीओ (कार्बन मोना) १६ ११५ ५८
ओ-३ (ओझोन) ०३ १६२ ६०
पाडव्याच्या दिवशीचे(दि़३१) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)
हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरी
पीएम १० (धुलीकण) १९ ४४ ३२
एसओ-२ (सल्फर) ०२ २९ १२
एनओ-२ (नायट्रोजन) ०८ १४६ ६५
पीएम २़५ (धुलीकण) १८ ११५ ४९
सीओ (कार्बन मोना) २२ १२० ७१
ओ-३ (ओझोन) ०५ १३६ ५९
भाऊबीजेच्या दिवशीचे(दि़०१) वायुप्रदूषण (मायक्रो ग्रॅम पर क्युबीक मीटर)
हवेतील घटककमीत कमी जास्तीत जास्त सरासरी
पीएम १० (धुलीकण) १९ ४३ ३०
एसओ-२ (सल्फर) ०१ २३ ०७
एनओ-२ (नायट्रोजन) ३७ १५५ ७२
पीएम २़५ (धुलीकण) १९ ८० ४३
सीओ (कार्बन मोना) १५ ९४ ४९
ओ-३ (ओझोन) ०२ १७४ ८५
लक्ष्मीपूजन (दि़३०) ध्वनी प्रदूषणाची पातळी (आकडेवारी डेसीबलमध्ये)
परिसर २०१४ २०१५२०१६
१) सीबीएस २३ आॅक्टो़११ नोव्हे़३० आॅक्टो़
दिवसा ८५.५ ८१़९७७़४
रात्री ८२.२ ८१़७७४़७
२) पंचवटी
दिवसा ८१.५ ७८़५७०़५
रात्री ७०.० ७५़२७०़६
३) दहिपूल
दिवसा ८२.६ ७९़५७०़२
रात्री ७७.८ ७४़९६७़८
४) सिडको
दिवसा ७६.३ ७२़८७२़४
रात्री ६०.४ ५८़१५९़९
५) बिटको पॉर्इंट
दिवसा ८३.९ ७९़६७३़८
रात्री ७५.२ ७९़०७२़०