सोयीच्या प्रकल्पासाठी महाग प्रकल्पांची तुलना (टिप- कृपया बोल्ड केलेली ओळ पाहणे. )
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:02+5:302021-05-31T04:12:02+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेतील गरज म्हणून महापाालिकेच्या वतीेने ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी विविध प्रकल्प साकारण्यात येत आहेत. त्यात बिटको रुग्णालयाजवळ ...
कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेतील गरज म्हणून महापाालिकेच्या वतीेने ऑक्सिजनची निर्मिती करण्यासाठी विविध प्रकल्प साकारण्यात येत आहेत. त्यात बिटको रुग्णालयाजवळ क्रायोजनिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता पाचशे सिलिंडर प्रतिदिन भरण्याची असून, त्यासाठी महापालिका सुमारे सात ते आठ कोटी रुपये खर्च करून, सर्व प्रकल्पाची उभारणी करून तो ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. ठेकेदार फक्त मुख्य प्लँट बसवून दहा वर्षे सिलिंडर भरून देण्याचा खर्च करणार आहे. मात्र, प्रकल्पाचे संचलन, तसेच देखभाल दुरुस्तीसाठी ठेकेदाराला माेठी किंमत मोजावी लागणार आहे. त्या तुलनेत कमी खर्चिक आणि कमीतकमी देखभाल असलेले पीएसए तंत्रज्ञान असून, त्याचे प्रकल्पही महापालिका करीत असताना, या प्रकल्पासाठीही होऊ द्या, खर्च असा प्रकार सुरू आहे.
महापालिकेच्या डॉ.झाकीर हुुसेन रुग्णालयासह काही ठिकाणी प्रशासन पीएसए प्रकल्प साकारात असून, दुसरीकडे मग वेगळ्या महागड्या खर्चाचा प्रस्ताव कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाची तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी यांत्रिकी विभागाला सांगण्यात आले असताना, दुसरीकडे दोन खासगी प्रकल्पांचे आणि नंदूरबार येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्लांट अशी दोन तुलना करण्यात आली असून, त्यात महापालिकेच्या सोयीचे ठरेल, अशा पद्धतीने हाच प्रकल्प कसा सायीचा आहेे, असे त्यात नमूद केले आहे. त्यामुळे सर्व तयारी करून यांत्रिकी विभागाची औपचारिक मान्यता घेण्याचा घाट घातला जात आहे.
इन्फो..
बायो मेडिकल इंजिनीअर कुठे आहे?
महपाालिकेकडे अशा प्रकारचे उद्योग करण्यासाठी बायो मेडिकल इंजिनीअरच नाही. त्यामुळे एक तर सर्व सोपस्कार वैद्यकीय विभाग पार पडतो आणि जेथे अडचण येते, तेथे अन्य विभागाच्या अभियंत्याच्या गळ्यात जबाबदारी टाकण्यात येते. रुग्णालयातील उपकरणे, तसेच ऑक्सिजन प्लांट यांसारख्या कामांसाठी बायो मेडिकल इंजिनीअरबायो मेडिकल इंजिनीअरची गरज आहे. मात्र, अशी कोणतीही पोस्ट महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर नाही.