अनुकंपा उमेदवारांना नोकरीची प्रतीक्षा
By admin | Published: September 21, 2016 12:59 AM2016-09-21T00:59:40+5:302016-09-21T00:59:52+5:30
बेमुदत उपोषण : भोंगळ कारभाराचा जलसंपदा विभागावर केला आरोप
नाशिक : अनुकंपा भरतीप्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जलसंपदा विभागाच्या २००८ पासूनच्या प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांनी सिंचन भवनच्या द्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून एकाही उमेदवाराला नोकरी देण्यात न आल्याने जलसंपदा विभागाच्या कारभाराविरुद्ध उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
२२ आॅगस्ट २००५ च्या अनुकं पा प्रतीक्षा यादीतील उमेदवार २००८ सालापासून संबंधित विभागात नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हलाकीची असून, बहुतांश उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षांच्या पुढे गेल्याने ते बाद होण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. मात्र जलसंपदा विभागाकडून याबाबत कुठलाही विचार केला जात नसल्याने अखेर सर्व उमेदवारांनी एकत्र येत बेमुदत आमरण उपोषणाला मंगळवारी (दि.२०) सुरुवात केली. उंटवाडी रस्त्यावरील सिंचन भवनच्या द्वारावर घोषणाबाजी करत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या जून महिन्यातही या उमेदवारांनी उपोषण केले होते. तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठलाही