अनुकंपाधारक अजूनही प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:51+5:302021-07-29T04:15:51+5:30
नाशिक: जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या दस्त नोंदणीला प्रतिसाद असला तरी या कार्यालयात निर्बंधांकडे दुर्लक्ष होत आहे. गर्दी वाढत असताना ...
नाशिक: जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या दस्त नोंदणीला प्रतिसाद असला तरी या कार्यालयात निर्बंधांकडे दुर्लक्ष होत आहे. गर्दी वाढत असताना कुठेही सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. याकडे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
तीन महिन्यांपासून दाखले पडून
नाशिक: जातीचे तसेच अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या अनेकांना तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही दाखले उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. शासकीय कामे जलद होत असल्याचे जिल्हाधिकारी सांगत असताना विद्यार्थी दाखले मात्र अजूनही प्रलंबित असल्याची तक्रार आहे.
पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा
नाशिक: निर्बंधांसह रेल्वे प्रवास सुरू झाला असला तरी अजूनही पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पुणे-नाशिक प्रवाशांकडून रेल्वेची विचारणा होत आहे.
मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित
नाशिक: आरोग्य विभागातील मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. सन २०१३ पासून वरिष्ठ लिपिक संवर्गातील मागासवर्गीय कर्मचारी हे पदोन्नतीपासून वंचित असून पदे रिक्त होत असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात नसल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केला आहे. याबाबत आरोग्य व कास्ट्राइबचे विभागीय अध्यक्ष दीपक पाळंदे यांनी निवेदन दिले आहे.
मुक्त विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया सुरू
नाशिक: मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.लिब., एम.कॉम., एम.लिब. आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. आठ विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांना याबाबतची माहितीही मिळणार आहे.
गोदावरी पात्रात वाढले पाणी
नाशिक: शहर परिसरात तसेच गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी गोदावरीला येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाण्यात तरुण पोहण्याचा आनंद घेऊ लागले आहेत.
दुबार पेरणीचे संकट टळले
नाशिक : जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून दोन दिवसांत १५ बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांनाही पावसाने जीवदान मिळाले असून शेतशिवारात पिके बहरली आहेत. दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.