सहा महिन्यांनी मिळाली नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:08+5:302021-08-25T04:20:08+5:30
कोरोनाचा प्रकोप आणि निसर्गाचा फटका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन वर्षांपासून अवकाळीचा सामना ...
कोरोनाचा प्रकोप आणि निसर्गाचा फटका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सलग दोन वर्षांपासून अवकाळीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या फेब्रुवारीतही चांगलाच फटका बसला.
अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला होता. एकाच महिन्यात दोनदा पंचनामा करण्याची वेळ आल्याने अंतिम अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. पाच महिन्यांनंतर शासनाकडून नुकसान भरपाई म्हणूण जिल्ह्यास ३ कोटी २ लाख ९८ हजारांची मदत प्राप्त झाली आहे.
मालेगाव, बागलाण, कळवण, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नर, येवला आणि चांदवड या तालुक्यांना अवकाळीचा फटका बसला होता. गहू, मका, सोयाबीन, कांदे यासह डाळिंब बागांचे नुकसान झाले. होते. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मेाठे आर्थिक नुकसान झाले होते. प्रशासनाने शासनाकडे भरपाई देण्याचा अहवाल शासनाला पाठविला होता. त्यानुसार आता जिल्ह्यासाठीची मदत प्राप्त झाली असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जात असून सर्वाधिक दीड कोटीची मदत बागलाण तालुक्यास प्राप्त झाली आहे.
--इन्फो--
२० हजार हेक्टरवरील नुकसानीची भरपाई
१८७ गावांमध्ये २० हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. बागलाणमध्ये डाळिंब बागांना अवकाळीचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करत शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सहा महिन्यांनंतर शासनाकडून जिल्ह्याला तीन कोटींची मदत प्राप्त झाली आहे. ही मदत थेट नुकसानग्रस्तांच्या खात्यावर वर्ग केली जात आहे.
--इन्फो--
तालुकानिहाय मदत प्राप्त
मालेगाव - २८८००
बागलाण - १५४६७०४५
कळवण - २७६१२०
दिंडोरी - ४८४९५००
नाशिक - ८२१४३०
निफाड - ८५८९७००
सिन्नर - २४०४८०
येवला - ४४५१००
चांदवड - ५७९८२५