सीबीएसई, आयसीएसईसोबत राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 01:09 AM2019-06-11T01:09:24+5:302019-06-11T01:10:33+5:30
राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते.
नाशिक : राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची तुलना नेहमी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची तुलना केली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अधिक असल्याने विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखांना सहज प्रवेश मिळत होते. मात्र यावर्षी दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असून, विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांवर यावर्षी परिणाम झाला असल्याने राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासोबच विविध तंत्रशिक्षण पदविका प्रवेशासाठीही अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.
दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी त्याच्या माध्यमिक शाला अथवा मार्गदर्शन केंद्रांमधून माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर या आॅनलाइन अर्जभरून प्रक्रियेला वेग आला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत नाशिकमधून ९० टक्क्यांपासून ते १०० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी होते.
मात्र यावर्षी निकालात मोठी घसरण झाली असल्याने अकरावी प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सीबीएसई, आयसीएसई बोर्डांच्या निकालापेक्षा घसरला असल्याने इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यातच शहरातील अकरावीच्या २३ हजार जागांसाठी २८ हजार माहिती पुस्तिकांची विक्री झाली आहे. अशा स्थितीत दहावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला शहरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा असल्याने शहरातील प्रमुख नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे.
आॅनलाइन अर्जाची पडताळणी
अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २८ हजार विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिकांची खरेदी केली आहे. त्यापैकी सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरला असून, १४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाची पडताळणी पूर्ण केली आहे.