शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 07:17 PM2018-09-03T19:17:58+5:302018-09-03T19:20:21+5:30

प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो.

 Competitive Examination for Physical, Mental Retardation - Dr. Ravindra Singhal | शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल

शारीरिक, मानसिक संयमाची परीक्षा पाहणारी स्पर्धा - डॉ. रवींद्र सिंघल

Next
ठळक मुद्देनाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे भव्य स्वागत स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे निर्धारित वेळेपूर्वी ४७ मिनिटे आधीच पार

नाशिक : फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारिरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती; मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पाथर्डीफाटा येथे करण्यात आलेल्या जाहिर सत्काराप्रसंगी ते बोलत होते.
स्पर्धा जिंकल्यानंतर नाशिकला सिंगल यांचे सोमवारी (दि.३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. शहराच्या वेशीवर नाशिककरांसह पोलीस आयुक्तालयातील अधिका-यांच्या उपस्थितीत सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते. यावेळी सिंघल म्हणाले, प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण करण्यास यशस्वी ठरलो. वयाची पन्नाशी गाठल्यानंतर अशा प्रकारची खडतर स्पर्धेत विजेतेपद पटकाविणे हे मोठे आव्हान होते; मात्र दैनंदिन व्यायाम, सायकलिंगची सराव असल्यामुळे आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मी स्पर्धा जिंकू शकलो.
 पाथर्डीफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या आवारात नाशिक पोलीस आयुक्तालय व तमाम नाशिककरांच्या वतीने सिंघल यांचे पोलीसांच्या बँण्ड पथकाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी सिंघलयांच्यासमवेत त्यांचे वडील झिलेसिंग सिंगल, आई कांतादेवी सिंगल तसेच ‘आयर्नमॅन’ स्पर्धेतील स्पर्धक राहिलेली त्यांची कन्या रविजासह पत्नी विनिता सिंघल यादेखील उपस्थित होत्या. यावेळी उपआुयक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त बापू बांगर, शांताराम आडके, अशोक नखाते, शांताराम पाटील, मोहन ठाकूर, अजय देवरे, पोलीस निरिक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड यांच्यासह अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title:  Competitive Examination for Physical, Mental Retardation - Dr. Ravindra Singhal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.