तक्रारदारास जिल्हा परिषदेत मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:40 PM2020-10-08T23:40:32+5:302020-10-09T01:13:58+5:30
नाशिक: जिल्हा परिषदेत ग्रामपंचायत कामाच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या तक्रारी ची सुनावणी साठी उपस्थित असलेल्या तक्रारदारासच संबंधित तीन ते चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा परिषदेत घडली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायत कामात झालेल्या भ्रष्टाचाराची मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या समोर बुधवारी सुनावणी असताना तक्रारदार विठोबा द्यानद्यान हे हजर झाले होते. याच वेळी शांताराम रतन लाठर, नामदेव भिका शेजवळ, सरपंच पुत्र भाऊलाल पंडित निमडे, ग्रामपंचायत रोजगार सेवक हाटेसिंग त्र्यंबक धाडिवाल यांनी द्यानद्यान यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सदर ठिकाणी आरडाओरड सुरु झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर सर्व जण फरार झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याची शाहनिशा करावी. तसेच कागदोपत्री कामे दाखवून हडप केलेली शासनाची रक्कम वसूल व्हावी अशी मागणी तक्रारदार विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी केली आहे.