आश्रमशाळेतील भोजनाविषयी तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:37 AM2018-07-04T00:37:06+5:302018-07-04T00:37:35+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतून इतर जवळील २२ आश्रमशाळांना पुरविल्या जाणाऱ्या भोजनासंदर्भात अनेक तक्रारी असून, दर्जेदार जेवन द्यावे आणि वेळेत पोहोचवावे, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त दिलीप गावडे यांना नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आले.

दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे, आश्रमशाळेतून पुरविले जाणारे भोजन चांगल्या प्रकारचे पुरवावे. भोजन वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी भोजन वेळेत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तसेच या ठिकाणी परिसरातील अनेक दिवसांपासून ४६ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते.
मात्र, काही दिवसांपूर्वी या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या जागेवर दुसºया कामगारांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच्याच कामगारांना कामावर घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे, उपाध्यक्ष सोमनाथ जोशी, तुकाराम वारघडे, बाळाभाऊ डहाळे, देवीदास धोंगडे, कृष्णा वारघडे, सुभाष जोशी, गोविंद पोटकुले, भरत वारघडे, संजय गवारे, मदन वारघडे यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेबाबत कायम विविध प्रकारच्या तक्र ारी असतात. यासंदर्भात आम्ही वारंवार तोंडी
तक्र ार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच येथील कंत्राटी कामगारांना कामावर घ्यावे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- डॉ. श्रीराम लहामटे
जिल्हाध्यक्ष, पीपल्स फेडरेशन