सुनावणीत हस्तक्षेप होत असल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:04 AM2018-12-06T01:04:41+5:302018-12-06T01:04:54+5:30
सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स बँकेत नेमलेल्या प्रशासकांच्या नियुक्ती प्रकरणी विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या दालनात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना मयूर प्रकाश अलई हे अधिकाऱ्यांवर दबाव आणून हेतुपुरस्सरपणे या प्रकरणात हस्तक्षेप करीत असल्याची तक्र ार बँकेच्या पंधरा संचालकांनी सहकार सचिव (मुंबई) यांचेकडे केली आहे.

याबाबत केलेल्या तक्र ार अर्जात संचलकांनी म्हटले आहे की, सुनावणीच्या चारही तारखांना मयूर अलई हे विभागीय सहनिबंधक कार्यालयात अधिकाºयांसमोर खुर्ची टाकून बसले व त्यांचे वर दबाव टाकून दहशत निर्माण करीत आहेत. कार्यालयाचे कामकाज माझ्या आदेशान्वयेच सुरू असल्याचा दावा ते करत असतात. दि.३ डिसेंबर रोजी संचालकांची भूमिका अधिकाºयांनी समजून घेतल्यावर न्यायालयाने प्रतिवादी यांना बोलण्याची संधी दिली.
यावेळी अलई यांनी मध्येच हस्तक्षेप करून सुनावणी पुढील तारखेस घ्यावी यासाठी हुज्जत घातली. न्यायालयाने प्रतिवादी यांना पुढील सुनावणीसाठी ७ डिसेंबर ही तारीख दिली असता अलई यांनी १५ तारखेची मागणी केली.
तक्र ार अर्जावर श्रीधर कोठावदे, अशोक निकम, रमेश देवरे, राजेंद्र अलई,कल्पना येवला, यशवंत अमृतकार, पंकज तातर, कैलास येवला, जयवंत येवला, जगदीश मुंडावरे,प्रवीण बागड, प्रकाश सोनग्रा, दिलीप चव्हाण,रूपाली कोठावदे यांच्या स्वाक्षºया आहेत. कायदेशीर कारवाईची मागणी
च्राजकीय दबावापोटी ७ डिसेंबर ला होणारी सुनावणी लांबल्याची शक्यता असल्याची तक्र ार अर्जात नमूद करण्यात आली आहे. मयूर अलई यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.