सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:58 AM2018-07-25T00:58:16+5:302018-07-25T00:58:31+5:30

पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़

 Complaint about the marriage of his father-in-law | सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार

सासरच्यांनी घरफोडी केल्याची विवाहितेची तक्रार

googlenewsNext

नाशिक : पती व सासरच्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप, दुचाकी व न्यायालयीन दाव्याची कागदपत्रे असा सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना इंदिरानगरमध्ये घडली़  इंदिरानगरमधील अमिदीप अपार्टमेंटमधील विवाहिता सोबिया पाटोळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार ८ जून ते १८ जुलै २०१८ या कालावधीत त्यांचे पती अमोल पाटोळे, नलिनी पाटोळे (सासू), जगदीश पाटोळे (सासरे) व सासरकडील नातेवाईक आशिष पाटोळे, हेमंत पाटोळे (रा़ सार्थक बंगला, जयबाई कॉलनी, नाशिकरोड) यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला़  तसेच घरातील तीन कॅमेरे, सोन्याची अंगठी, डेल कंपनीचे दोन लॅपटॉप, अ‍ॅक्टिवा दुचाकीचे कागदपत्र याबरोबरच न्यायालयीन दाव्यातील कागदपत्रे असा १ लाख २१ हजार ६३३ रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title:  Complaint about the marriage of his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.