गैरव्यवहार झाल्याची तक्रार

By admin | Published: September 9, 2016 12:44 AM2016-09-09T00:44:18+5:302016-09-09T00:44:34+5:30

गैरव्यवहार झाल्याची तक्रार

Complaint about the misconduct | गैरव्यवहार झाल्याची तक्रार

गैरव्यवहार झाल्याची तक्रार

Next


चांदवड : गौतमनगर येथील पाणीपुरवठा योजनाचांदवड : तालुक्यातील तळेगावरोही येथील दलित सुधार योजनेंतर्गत ग्रामपंचायत २००६ ते २००७ या कालावधीत झालेल्या गौतमनगर, सिद्धार्थनगर वस्तीमधील पाणीपुरवठा योजनेमध्ये गैरव्यवहार झाला असून या कालावधीतील संबंधित सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर पोलीस कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंबादास केदारे यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनंी वरिष्ठांकडेही दि. १३ व १४ जुलै रोजी अहवाल दिला असून यासंदर्भात वरिष्ठांनी चौकशी करावी, असे अहवालात म्हटले आहे. सन २००६-२००७ मध्ये झालेले दलित सुधार योजनेंतर्गत गौतमनगर, सिद्धार्थनगर वस्तीमधील पाणीपुरवठा योजना अपूर्ण व्यवस्थेत असून शासनाकडून ग्रामपंचायतीने २००६-२००७ मध्ये विहीर व पंपिंग मशिनरी व पाइपलाइन पाण्याच्या टाकीकरिता एकूण रक्कम रुपये दोन लाख ८३ हजार ८०० रुपये घेतलेले आहे. परंतु सदर दलित वस्त्यांमध्ये ही पाइपलाइन केलेली दिसत नाही. तसेच पंपिंग मशिनरी जोडलेल्या नाही. त्यामुळे येथील दलित वस्त्यांमध्ये ही पाइपलाइन केलेली दिसत नाही. तसेच पंपिंग मशिनरी जोडलेल्या नाही. त्यामुळे येथील दलित जनता पाणी मिळत नसल्याने वंचित राहिलेली आहे असेही निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)
४नाशिक : पंचवटी कारंजा येथे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून, वाहनधारकांनी नियमांचे आणि शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतूक पोलीस नसताना सर्रास सिग्नल तोडण्याचेही प्रकार वाढले आहेत.

Web Title: Complaint about the misconduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.