आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 02:08 PM2019-06-28T14:08:17+5:302019-06-28T14:09:18+5:30
पेठ- विद्यार्थी प्रवेश प्रक्रि येबाबत पंचायत समतिी सभागृहात माध्यमिक व शासकिय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची येथे आढावा बैठक घेण्यात आली.शाळा विकास निधीच्या नावाखाली आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार यावेळी करण्यात आली.

तालुक्यातील ली ते बारावीपर्यंतचा एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागासह संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी असे आवाहन यावेळी सभापती पुष्पा गवळी यांनी केले. वर्गिनहाय रिक्त जागांचा आढावा घेऊन ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही त्यांना सामावून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. संबंधित शाळांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. निवासी शाळांमध्ये निकृष्ट प्रकारचे भोजन दिले जाते. वस्तीगृहातील अस्वच्छता यावर बैठकीत तक्र ारीचा पाढा वाचण्यात आला. यावेळी उपसभापती तुळाशीराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, शाम गावीत, नंदु गवळी, सुरेश पवार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, अमति भुसावरे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले यांचे सह विस्तार अधिकारी, माध्यमिक, शासकिय आश्रमशाळा मुख्याध्यापक उपस्थित होते.
चार वर्गांना शिकवतो एक शिक्षक
फोटो -
पेठ येथे शाळा प्रवेश आढावा बैठकीप्रसंगी सभापती पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, शाम गावीत, विलास अलबाड आदी.
(28 पेठ स्कूल)