रेशन दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रार

By admin | Published: December 23, 2014 10:38 PM2014-12-23T22:38:55+5:302014-12-23T22:39:14+5:30

रेशन दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रार

Complaint about ration shops do not get food | रेशन दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रार

रेशन दुकानांमधून धान्य मिळत नसल्याची तक्रार

Next

सिडको : येथील प्रभाग ४४ मधील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचे धान्य मिळत नसल्याने येथील नगरसेवक शीतल भामरे यांच्या नेतृत्वाखाली धान्य पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
सिडकोतील प्रभाग ४४ मधील सातही धान्य दुकानदारांकडून धान्य वितरीत केले जात नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. नागरिकांनी नगरसेवक शीतल भामरे व संजय भामरे यांची भेट घेत अडचणींची माहिती दिली. यानंतर भामरे यांनी लगेचच नागरिकांना बरोबर घेत धान्य पुरवठा अधिकारी उजागरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी आशा खैरनार, सविता चितळे, इंदुबाई सायंकर, भारती मोरे, वनिता हिरे, स्नेहल दाणे, सुनीता कडवे, रेखा सैंदाणे, सरला खर्डे, सुमन आंबेकर, मन्सुरी सरदार, माधुरी देसाई, विमल आव्हाड, मंदा चिखले, संगीता पारखे आदिंसह प्रभागातील महिला उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Complaint about ration shops do not get food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.