शौचालय बांधकामात फसवणूक केल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:35 PM2017-09-27T23:35:54+5:302017-09-28T00:08:02+5:30
धोंडबार येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयात आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याने या शौचालयाची शासकीय रक्कम १२ हजार रुपये असून, लाभार्थींनी प्रत्येकी ३ हजार रुपये न दिल्यास ते परत जाईल, असे सांगितले जाते.
सिन्नर : धोंडबार येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या वैयक्तिक शौचालयात आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य तातू जगताप यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याने या शौचालयाची शासकीय रक्कम १२ हजार रुपये असून, लाभार्थींनी प्रत्येकी ३ हजार रुपये न दिल्यास ते परत जाईल, असे सांगितले जाते. काही लाभार्थींकडून प्रत्येकी ३ हजार रुपये फसवणूक केल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. सदर शौचालयाचे काम निकृष्ट पध्दतीने झाले आहे. संबंधित ठेकेदार व तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करून आदिवासी बांधवांनी ३ हजार रुपये परत करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर पंचायत समिती सदस्य तातू जगताप, भाजपाचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, योगीता कांदळकर यांच्यासह तानाजी खेताडे, सोमनाथ साबळे, बहिरू खेताडे, भरत खेताडे, प्रमोद जगताप, शंकर खेताडे, किसन साबळे, लक्ष्मण खेताडे, जीजाबाई धोंडगे, धोंडीराम कवटे, तुळशीराम शिंदे, परसराम खेताडे यांच्या स्वाक्षºया आहेत.