गटविकास अधिकाऱ्या विरोधात भातोड्याच्या सरपंचाची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 07:07 PM2019-11-19T19:07:53+5:302019-11-19T19:09:13+5:30
वणी : दिंडोरी तालूक्यातील भातोडे येथील सरपंच दत्तुु गावित यांनी दिंडोरी पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या विरोधात तक्र ारीचे निवेदन पत्र सादर केल्याने दिंडोरी पंचायत समिती पुन्हा प्रकाश झोतात आली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क

भातोडे येथे कार्यरत ग्रामसेवक यांच्या विरोधात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने भातोडे येथे ग्रामपंचायतमध्ये जाऊन शहनिशा करणे जाबजबाब घेणे, निराकारण करणे तसेच केलेल्या कार्यवाहीची नोंद शेरेपुस्तकात करणे नियमाने बंधनकारक आहे.
मात्र चौकशी अधिकारी व वरीष्ठ अधिकारी यांनी भातोडे येथे भेट दिली नाही, व चौकशीही केली नाही. केवळ हेतुपूरस्कर आकस बुद्धीने ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केली आहे.
तरी या प्रकरणाची चौकशी करु न अवास्तव केलेली कारवाई रद्द करण्याची मागणी निवेदनपत्राद्वारे केली आहे. त्यामुळे संबधित अधिकाऱ्यांची चौकशी लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने दिंडोरी पंचायत समितीत जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
लखमापुर घरकुल आनियमीततेच्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना गटविकास अधिकारी यांच्या विरोधात सरपंचांनी तक्र ार केल्याने तर्कवितर्क करण्यात येत आहेत.