मुलास पळवून नेल्याची तक्रार
By admin | Published: December 20, 2015 11:23 PM2015-12-20T23:23:01+5:302015-12-20T23:33:50+5:30
मुलास पळवून नेल्याची तक्रार
ओझर टाऊनशीप : येथील एका अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. ओझर टाऊनशीपमधील टाईप टू बी १९८७ येथील सुरेश काळू गवते यांचा मुलगा आदित्य (१४) हा गुरुवारी (दि.१६) दुपारी १२ वाजता घरातून बाहेर गेला. तेव्हापासून त्याचा परिसरासह नातेवाईक व मित्र परिवाराकडे शोध घेतला असता त्याचा कुठेही तपास लागला नाही. त्यामुळे आदित्यला कोणीतरी भूरळ घालून किंवा आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार सुरेश गवते यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाची नोंद केली आहे. आदित्यची उंची ५ फूट असून मजबूत बांधा, गोल चेहरा, रंग गोरा असे वर्णन आहे. त्याने अंगावर पांढऱ्या रंगाची जिन्स पॅन्ट, हिरव्या रंगाचा शर्ट, तपकीरी रंगाचे सँडल असा पेहराव परिधान केलेला आहे. या वर्णनाचा मुलगा आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार शामराव सोनवणे यांनी केले आहे. (वार्ताहर)