धनादेश वटत नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:20 AM2018-03-19T00:20:06+5:302018-03-19T00:20:06+5:30
नांदगाव : कांदा विक्री करून घेतलेला धनादेश दीड ते दोन महिने वटला जात नाही व सदर धनादेश बाउन्सदेखील होत नाही. कित्येक दिवस सदर धनादेश बॅँकेत पडून असतात, अशी कैफियत (शेतकऱ्यांकडून) बाजार समितीकडे केली जात आहे. या सततच्या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
नांदगाव : कांदा विक्री करून घेतलेला धनादेश दीड ते दोन महिने वटला जात नाही व सदर धनादेश बाउन्सदेखील होत नाही. कित्येक दिवस सदर धनादेश बॅँकेत पडून असतात, अशी कैफियत (शेतकऱ्यांकडून) बाजार समितीकडे केली जात आहे. या सततच्या प्रकाराने शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकºयांनी शेतमाल विक्रीचा धनादेश बँकेत जमा केल्यानंतर व्यापाºयांच्या खात्यात पैसे नसताना, चेक बाउन्स न करता, वीस ते पंचवीस दिवस तो चेक होल्ड करून शेतकºयांना वेठीस धरले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यात यावा. या मागणीसाठी नांदगाव बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांची भेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नीलेश चव्हाण, ज्ञानेश्वर निकम, जगदीश निकम यांनी घेतली व यावर उपाय करण्याची मागणी केली. दरम्यान, आप्पा भिलोरे यांचा ५० हजार रुपयांचा चेक नांदगाव स्टेट बँकेत पडून होता. एक महिन्यानंतर पैसे खात्यावर जमा झाले. आमच्याकडे आॅनलाइन सेवा नाही, असे उत्तर बँकेतून अधिकारी देतात. सध्या शेतकºयांची बँकेत ससेहोलपट सुरू आहे, तर खासगी बँकेत त्याच दिवशी पैसे मिळतात पण त्या बॅँकेचे चेक व्यापारी देत नाहीत, अशीही व्यथा शेतकºयांनी मांडली आहे.