गोदापात्रातील मृत माशांबाबत आयुक्तांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:43 AM2019-06-12T00:43:49+5:302019-06-12T00:44:05+5:30
गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली
ठळक मुद्देनदी प्रदूषितच : पंडित यांनी केली कारवाईची मागणी
नाशिक : गोदावरी नदीत प्रदूषण होतच असते; परंतु त्याचबरोबर तपोवनात गोदा-कपिला संगमातील प्रदूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले. लोकमतने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर गोदा प्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढा लढणाऱ्या राजेश पंडित यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असून, याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
उच्च न्यायालयाने गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली असून, अध्यक्ष या नात्याने पंडित यांनी त्यांच्याकडे तक्रार केली आहे.