आरोग्यमंत्र्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

By admin | Published: June 27, 2017 01:08 AM2017-06-27T01:08:39+5:302017-06-27T01:09:22+5:30

सुरगाणा : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी ग्रामीण रूग्णालय आरोग्य केंद्राच्या पाहणी दौऱ्यात नागरिकांनी आरोग्यसेवेबाबत तक्रारींची पाढाच वाचला.

Complaint to the complaints of health workers | आरोग्यमंत्र्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

आरोग्यमंत्र्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सुरगाणा : राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सोमवारी केलेल्या ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणी दौऱ्यात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी आरोग्यसेवेबाबत तक्रारींची पाढाच वाचला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, आमदार जे. पी. गावित, सभापती सुवर्णा गांगोडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. तालुका दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी प्रथम बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे व नागरिकांनी येथील आरोग्यसेवेचा बोजवारा उडून कसे रामभरोसे चालले आहे याबाबत तक्र ारींचा पाढाच कथन केला. बुबळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला मनखेड येथे प्रतिनियुक्तीवर पाठवले, तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला कोणताही विचार न करता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी एक महिन्याची रजा मंजूर केली. याठिकाणी प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्र रामभरोसे चालले असल्याची तक्र ार झाल्याने आरोग्यमंत्री सावंत यांनी संबंधित वरिष्ठांपासून सर्वांनाच धारेवर धरले. पुढच्यावेळी परत येईन तेव्हा एकही तक्र ार यायला नको अशी तंबी दिली. बोरगाव येथेही दोन पदे मंजूर असताना गेल्या दीड वर्षापासून एकच वैद्यकीय अधिकारी आहे. त्यांनाही पाच दिवसांची रजा मंजूर करून सोडून दिले. बोरगाव आरोग्य केंद्र हे महामार्गावर असल्याने अपघातातील जखमींवर उपचार करण्यास अडचणी येतात. त्यामुळे येथे १०८ अ‍ॅम्बुलन्स देण्यात येऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारींची नेमणूक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.  सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाची मात्र उशीर झाल्याने धावती पाहणी झाली. यावेळी आमदार जे. पी. गावित, सभापती सुवर्णा गांगोडे, नगराध्यक्ष सचिन आहेर, नगरसेवक भरत वाघमारे, भाजपाचे जि. प. सदस्य एन. डी. गावित, नगरसेवक सुरेश गवळी आदींनीही सुरगाणा ग्रामीण रूग्णालयाच्या समस्यांबाबत तक्रारी केल्या. येथे स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, एक्स-रे यासह या ग्रामीण रूग्णालयासह तालुक्यातील सर्व रिक्त पदे भरण्यात येऊन सुरगाणा येथे लवकरात लवकर सुविधा संपन्न उपजिल्हा रूग्णालय देवून होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली.

 

Web Title: Complaint to the complaints of health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.