टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:54 AM2019-12-25T00:54:30+5:302019-12-25T00:54:49+5:30

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना चौकशीचे साकडे घातले आहे.

Complaint of corruption in the work of the Gram Panchayat | टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

टोकडे ग्रामपंचायतीच्या कामात भ्रष्टाचाराची तक्रार

Next
ठळक मुद्देनिवेदन : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे साकडे

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, ज्या कामांच्या नावाने देयके काढण्यात आली ती कामेच गावात अस्तित्वात नसल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांना चौकशीचे साकडे घातले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, टोकडे ग्रामपंचायतीत सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात चौदावा वित्त आयोगाचा मिळालेला निधी तसेच आमदारांच्या विकासकामांच्या निधीतून कामे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात जागेवर एकही काम अस्तित्वात दिसत नसल्याचे म्हटले आहे. त्यात प्रामुख्याने भगतसिंह सभा मंडप, संगणक कक्ष, चौक सुशोभीकरणाचे एकही काम झालेले नसताना लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावात ३२६ शौचालये बांधून ३९ लाख रुपये खर्च झाल्याचे दाखविले जात असताना त्यापैकी फक्त ५० शौचालयांचा वापर सुरू असून, बºयाच शौचालयांना टाक्या नाहीत, काहींना दरवाजे व भांडेदेखील बसविण्यात आलेले नाहीत. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील व्यक्तींना दोन दोन घरकुले वाटप करण्यात आले असून, गावात करण्यात आलेल्या पाइपलाइनमध्ये देखील गैरव्यवहार झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात येऊनही दखल घेण्यात आलेली नाही. गावात बांधण्यात आलेल्या स्मशानभूमी कामाची अभियंत्यांमार्फत चौकशी करण्यात येऊन त्यात निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आदेश देऊनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्षग्रामपंचायतीला पुन्हा नव्याने स्मशानभूमीची कामे करण्याचे आदेश देण्यात येऊनही ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले असून, या साºया कामांची पुन्हा चौकशी करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थ सामूहिकपणे उपोषणास बसतील, असा इशारा विठोबा द्यानधान, वसंत शेजवळ, विजयसिंग डिंगर, नितीन सूमराव, जव्हारसिंग संगेडा, हेमंत फरस, नितीन डिंगर, सोपान सूमराव, भगवान रंगी आदींनी दिला आहे.

Web Title: Complaint of corruption in the work of the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.