बंधारा फोडल्याने नुकसान झाल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:04+5:302020-12-15T04:31:04+5:30
-------------------- मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिन्नर: उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा ...
--------------------
मुख्याध्यापक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिन्नर: उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध लागू करण्याबाबतचा शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा निर्णय हा अन्यायकारक आहे. आकृतीबंध समितीने सुचवलेल्या सूचनांच्या पूर्णपणे विरोधात हा शासन निर्णय आहे. त्यामुळेच मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जाहीर निषेध करीत असल्याचे आणि विविध मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघटना व महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी संघ यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष एस.बी.शिरसाठ यांच्यासह पदाधिकारी हजर होते.
---------------------
यशवंतराव राजे मुकणे जयंती
सिन्नर : जव्हार संस्थानचे १९ वे राजे यशवंतराव राजे मुकणे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आदिवासी कोळी महादेव समाज, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेड, महामित्र परिवार व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजे यशवंतराव राजे मुकणे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
-------------------
पांढुर्लीत चहा विक्रेत्यावर दांडगाईची तक्रार
सिन्नर : तालुक्यातील पांढुर्ली येथील चहा विक्रेत्याची टपरी उद्ध्वस्त करून त्याच्यावर उपासमारीची वेळ आणणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पांढुर्ली येथील दगू देवराम साळवे गेल्या काही वर्षांपासून सदर जागेत साळवे कुटुंब चहाची विक्री करुन उदरनिर्वाह करतात. त्यांच्या टपरीचे नुकसान केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
---------------
२५० आंब्याच्या रोपांची लागवड
सिन्नर: तालुक्यातील माळवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ महादू आव्हाड यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी मुलगा रघुनाथ आव्हाड आणि नातू तथा गावचे उपसरपंच संपत आव्हाड यांनी गावातील घरांसमोर २५० खड्डे खोदून स्वखर्चातून केशर आंब्याची लागवड केली.