हक्काचे पाणी मिळत नसल्याची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:13 AM2018-04-24T00:13:10+5:302018-04-24T00:13:10+5:30
तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली.
येवला : तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. या बैठकीसाठी भाजपा नेते बाबा डमाळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी डमाळे यांनी समस्या समजावुन घेत आपण जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन व संबंधित अधिकार्यामार्फत ही समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले. उंदिरवाडी च्या धामणानदीवरील सर्व बंधारे पाण्याने पालखेड कालव्याच्या आवर्तनातून यापूर्वी भरून दिले जात होते. याकरिता धामणगाव शिवारातील फाळके नाल्यावर झडत होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून ती बंद झाली आहे. या ठिकाणी दरवाजा (गेट) बसवण्याकरीता शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. याकरीता अनेक अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मागणी करूनही सदर समस्याचे निराकरण होत नाही. यासाठी बाबा डमाळे आपला प्रश्न मार्गी लावतील या अपेक्षेने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या समस्यांचा पाठपुरावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत सोडवू असे डमाळे यांनी यावेळी आश्वासन दिले.
याप्रसंगी बाळासाहेब देशमुख, मारु ती जेजुरकर, संतोष केंद्रे, प्रशांत देशमुख, संजय देशमुख, गोटीराम देशमुख, मुन्ना देशमुख, बापू देशमुख, अशोक पवार, तुळशीदास देशमुख, दिगंबर जेजुरकर, अरविंद क्षीरसागर, गोविंद क्षीरसागर, राजेंद्र क्षीरसागर, शुक्लेश्वर पवार, वाल्मीक देशमुख, सुदाम गायकवाड, अमोल जेजुरकर, दत्तू चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.