निमा कार्यकारी सचिवाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:19 PM2020-09-25T23:19:53+5:302020-09-26T00:39:01+5:30
सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
सातपूर : सरकारी (धर्मदाय उपायुक्त कार्यालयाच्या) नोटीसमध्ये फेरफार करुन दिशाभूल केल्या बद्दल निमाचे कार्यालयीन सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निमा विश्वस्त मंडळाने सातपूर पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,काही विशेष बाबींसाठी उद्भवलेल्या तक्रारीमुळे धर्मदाय उपायूक्तांकडे सुनावणी सुरू आहे.धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडून निमा कार्यालयात सुनावणीसाठी विश्वस्तांनी हजर राहणे बाबतची नोटीस दि.23 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली होती.सदर नोटीस मध्ये धर्मादाय उपायुक्त यांच्या न्यायालयात विश्वस्त मंडळाला दि. 24 सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हजर राहावे असे निर्देश दिले होते.परंतु निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांनी निवृत्त झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली अत्यंत महत्वाच्या नोटीसमध्ये अनधिकृत रित्या खाडाखोड करुन विश्वस्त मंडळाची दिशाभूल केली आहे.सदर तारखेला आम्ही हजर राहू नये ज्यामुळे विश्वस्त मंडळावर कठोर कारवाई होईल.या उद्देशाने सदर तारखे मध्ये फेरफार केला आहे.आम्ही त्या तारखेला अनुपस्थित राहिल्यास आमच्या वर कोर्टाचा अपमान केल्याची कारवाई सुद्धा होऊ शकते.हे माहिती असून सुद्धा कार्यकारी सचिव सोनाली देवरे यांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे.याबाबत त्यांना सक्त ताकीद देऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.तसेच दबावतंत्राचा वापर करणाºया निवृत्त पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करावी.अशी तक्रार
निमा विश्वस्त मंडळ सदस्य मनीष कोठारी,मंगेश पाटणकर,धनंजय बेळे,संजीव नारंग आदींनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जाद्वारे केली आहे.