जादा दराने स्टॅम्पविक्री प्रकरणी पेालिसात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:13 AM2021-05-23T04:13:39+5:302021-05-23T04:13:39+5:30
लॉकडाऊनच्या काळात खरेदी विक्रीेचे व्यवहार बंद असले तरी शासकीय कामकाजाच्या अनेक प्रकारच्या निविदा निघत असल्याने पुरवठादारांना स्टॅम्प पेपर्सची आवश्यकता ...
लॉकडाऊनच्या काळात खरेदी विक्रीेचे व्यवहार बंद असले तरी शासकीय कामकाजाच्या अनेक प्रकारच्या निविदा निघत असल्याने पुरवठादारांना स्टॅम्प पेपर्सची आवश्यकता भासते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील वेंडर्सकडून स्टॅम्प उपलब्ध होत असले तरी शंभर रुपयांचा स्टॅम्प ५०० रुपयांना खरेदी करावा लागत आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत जादा दराने स्टॅम्प विक्री होत असल्याचे चित्रण एका जागरूक नागरिकाने केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. हे चित्रण समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
मागील वर्षात बनावट स्टॅम्पपेपर्स करून केलेला जमीन खरेदी घोटाळा नाशिक जिल्ह्यात गाजला होता. यामध्ये सक्रीय असलेल्या टोळीला ताब्यात घेण्यात आले हेाते. दस्तगहाळ होण्याच्या प्रकाराने देखील नाशिक जिल्ह्यातील घोटाळा राज्यात चर्चेत राहिला. आता जादा दराने स्टॅम्प विक्री प्रकरणामुळे पुन्हा या घटनांना उजाळा मिळाला आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.