विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:17 AM2018-06-18T00:17:02+5:302018-06-18T00:17:02+5:30
राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत सातपूर गावातील विक्रे त्यांना जागा उपलब्ध करून देऊनदेखील ते पुन्हा त्याच जागेवर बसतात. या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र विभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिले आहे.
सातपूर : राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत सातपूर गावातील विक्रे त्यांना जागा उपलब्ध करून देऊनदेखील ते पुन्हा त्याच जागेवर बसतात. या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र विभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दिले आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ अंतर्गत महानगरपालिका प्रशासनाने सातपूर गावातील भाजी मंडई आणि मंडई बाहेरील विक्रे त्यांची बायोमेट्रिक नोंदणी केली आहे. या नोंदणी केलेल्या विक्रे त्यांना वेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. नेमून दिलेल्या जागेवर व्यवसाय करावा, अशी अपेक्षा असताना हे विक्रेते मूळ जागा सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनतळाच्या जागेवर या व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. तसेच याठिकाणी अपघात होतात. वारंवार सांगून आणि वेळोवेळी कारवाई करूनदेखील हे विक्रे ते ऐकत नाहीत. त्यामुळे या विक्रे त्यांवर रितसर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी सातपूर पोलिसांत दिलेल्या पत्रान्वये केली आहे.