परबनगरातील पाणीटंचाईची महापौरांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:22+5:302021-04-18T04:13:22+5:30
ऐन उन्हाळ्यात दोन महिन्यांपासून परबनगर परिसरातील वनसंपदा सोसायटी, सन्मित्र वसाहत, बजरंग सोसायटी, ब्ल्यू मन कॉलनी, वंदना पार्क, गणराज ...
ऐन उन्हाळ्यात दोन महिन्यांपासून परबनगर परिसरातील वनसंपदा सोसायटी, सन्मित्र वसाहत, बजरंग सोसायटी, ब्ल्यू मन कॉलनी, वंदना पार्क, गणराज सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांची दखल घेऊन प्रभागाचे नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी एका महिन्यात जलवाहिनीतून दोनवेळा दगडधोंडे काढले. तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली असता शनिवार (दि १७) रोजी दुपारी महापौर कुलकर्णी, महापालिका सभागृह नेता सतीश सोनवणे, पूर्ण प्रभाग सभापती ॲड. शाम बडोदे यांनी परबनगर परिसरातील कृत्रिम पाणीटंचाईसंदर्भात पाहणी केली. यावेळी नागरिकांनी दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर महापौर कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र धारणकर यांना येत्या दोन दिवसांत कोणतेही तांत्रिक व इतर कारण न सांगता परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.