महिला उपजिल्हाधिऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:11+5:302021-09-22T04:18:11+5:30

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी हे सातत्याने विभागीय चौकशी तसेच गोपनीय अहवाल खराब करण्याची ...

Complaint of women Deputy Collectors against the District Collector | महिला उपजिल्हाधिऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

महिला उपजिल्हाधिऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Next

उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) या पदावर असलेल्या महिला अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत जिल्हाधिकारी हे सातत्याने विभागीय चौकशी तसेच गोपनीय अहवाल खराब करण्याची धमकी देत असल्याचे म्हटले आहे. याबाबतचे आपणाकडे पुरावे असल्याचा दावा देखील संबंधित महिला अधिकाऱ्याने केला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मात्र यांनी आरेापाचा इन्कार केला आहे.

संबंधित महिला उपजिल्हाधिकारी या गेल्या दोन वर्षांपासून कार्यालयात अनुपस्थित आहेत. याच कारणास्तव त्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचा अंतिम प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनास काही महिन्यांपूर्वी सादर केलेला आहे. त्यातून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्या आरोप करीत आहेत. उपजिल्हाधिकारी पदावर रूजू झाल्यापासून त्या सतत गैरहजर राहत आहेत. यशदा परीक्षेच्या कामकाजाची जबाबदारी त्यांनी नाकारलेली आहे शिवाय महापालिका निवडणुकीचे कामकाज आणि महिला व बालकल्याण विभागातील तपासणीचे कामकाजही टाळून त्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे. आता कारावाईच्या भीतीने त्या विनाकारण आरोप करीत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Complaint of women Deputy Collectors against the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.