विंचूर येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याची तक्र ार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 09:19 PM2019-03-06T21:19:24+5:302019-03-06T21:20:20+5:30

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.

Complaint of the work of the bundar at Vinnurur is scarce | विंचूर येथील बंधाऱ्याचे काम निकृष्ट असल्याची तक्र ार

बंधाºयाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम दाखवितांना स्थानिक नागरीक.

Next
ठळक मुद्देकामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.

विंचूर : येथील मरळगोई रस्त्यालगत पुंड-राऊत वस्ती जवळ बांधलेल्या बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्र ार येथील नागरीकांनी केली आहे.
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत पुंड-राऊत वस्ती जवळील बंधारा दुरु स्तीसाठी शासनाने पाच लाख रु पये निधी मंजुर केला. परंतु सदर बंधाऱ्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बांधण्यात आलेल्या बंधाºयाला हाताने घासले असता त्याची सिमेंट वाळु निखळुन पडुन खड्डा पडत आहे.
बांधकामामध्ये वाळु ऐवजी मातीचे प्रमाण जास्त वापरले आहे. तर सिमेंट खुपच कमी वापरले असल्याने बांधण्यात आलेला बंधारा हा पहिल्याच पावसात वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काम घेतलेली संस्था स्वत: काम न करता इतरांकडुन काम करु न घेत असल्याने कामाचा दर्जा खालावत गेल्याचे सांगितले जाते.
अशा प्रकारच्या बांधकामाची कोणत्याही अधिकरी वर्गाकडुन पाहणी करणे गरजेचे असते परंतु अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्याने अधिकारी कामाची पाहणी न करतांच बिल अदा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रु पयाचा निधी पाण्याबरोबर वाहुन जातो की काय अशी अवस्था आहे. या कामाची वरीष्ठांकडुन चौकशी करु न कारवाई करावी अन्यथा विंचुर तिनपाटीवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भास्कर राऊत, सुनिल ताजणे, सिताराम पुंड, बाळासाहेब पुंड, तुकाराम जाधव, निवृत्ती राऊत आदींसह नागरीकांनी दिला आहे.
 

 

 

Web Title: Complaint of the work of the bundar at Vinnurur is scarce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.