आरोग्य यंत्रणेविषयी तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:38 AM2020-07-25T00:38:52+5:302020-07-25T01:14:07+5:30
शासकीय रुग्णालयांमध्ये अपुºया खाटा, खासगी रुग्णालयांची मनमर्जी, आरोग्य यंत्रणेकडून उपचारात होणारा हलगर्जीपणा यासह विविध तक्रारींचा शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाढा वाचला. नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी असून, अजूनही कोरोनावर उपचारासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
नाशिक : शासकीय रुग्णालयांमध्ये अपुºया खाटा, खासगी रुग्णालयांची मनमर्जी, आरोग्य यंत्रणेकडून उपचारात होणारा हलगर्जीपणा यासह विविध तक्रारींचा शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाढा वाचला. नाशिक महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी असून, अजूनही कोरोनावर उपचारासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन येथे कोरोना आढावासाठी शासकीय अधिकारी व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीस पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, नाशिक महापालिका, जिल्हा पोलीसप्रमुख यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
भाजपच्या लोकप्रतिनिधींचा बहिष्कार
विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी बोलविलेल्या बैठकींना उपस्थित राहू नये, असा फतवा महाआघाडी सरकारने काढल्यानंतर त्यांचे राजकीय पडसाद नाशिकमध्ये उमटले असून, शुक्रवारी (दि.२४) राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या कोरोना आढावा बैठकीस भाजपच्या आमदार- खासदारांनी बहिष्कार टाकला.
४केवळ विरोधीपक्षच नव्हे तर आमदार, खासदारांनी बोलविलेल्या बैठकांनादेखील उपस्थित राहू नका, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. हा आदेश लोकशाही विरोधी असून, आमदार खासदार लोकांचीच कामे करीत असतात. त्यांच्या बैठकांना गैरहजर राहण्याचे फर्मान काढणे चुकीचे आहे. परंतु महाआघाडी सरकारने असा आदेश काढल्याने निषेध म्हणून पवार यांच्या बैठकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे भाजपच्या प्रदेश महामंत्री आणि आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.