सुरगाणा ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:05 AM2018-01-23T00:05:15+5:302018-01-23T00:22:12+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील यांच्यासमोर रुग्णांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींची तक्रार केली.
सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील यांच्यासमोर रुग्णांनी येथील ग्रामीण रुग्णालयातील गैरसोयींची तक्रार केली. यानंतर पदाधिकाºयांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता येथे अनेक तक्रारी असल्याचे उघडकीस आले. एक महिना गैरहजर असूनही येथील डॉक्टरने त्या महिन्याचे वेतन काढून घेतल्याची गंभीर बाब शिवसेना पदाधिकाºयांनी येथील ग्रामीण रुग्णालयात दिलेल्या भेटीत समोर आली आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील गैरसोयींबाबत पदाधिकाºयांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. हट्टी येथे गटनिहाय बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे लोकसभा, विधानसभा संपर्कप्रमुख व जिल्हाध्यक्ष यांनी येथील ग्रामीण रुग्णालय व मुलांच्या शासकीय वसतिगृहाला भेट दिली असता काही त्रुटी आढळून आल्याने याबाबत आपण चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, कळवण- सुरगाणा विधानसभा संपर्कप्रमुख केसरनाथ पाटील आदी पदाधिकाºयांनी सुरगाणा ग्रामीण रुग्णालय, मुलांचे शासकीय वसतिगृह, बाºहे ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, नगरसेवक भारत वाघमारे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी अधिकारी व कर्मचारी हजर नसतात मात्र रजिस्टरवर सह्या असतात. केलेल्या सह्या एकाच दिवशी केल्याची बाब निदर्शनास आल्याचे ग्रामीण जिल्हाप्रमुख तांबडे यांनी म्हटले आहे. औषध साठा पुरेसा नसल्याने बाहेरून औषधे आणावी लागत असल्याचे यावेळी रुग्णांच्या कुटुंबीयांनी सांगितले. कर्मचारी वर्गदेखील कमी असल्याचे सांगण्यात आले. बोरगाव येथेही स्टाफ कमी असल्याचे सांगण्यात आले. येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहाची पाहणी केली असता इमारतीमधील शौचालयांची दुरवस्था झालेली दिसून आली.