बेकायदेशीर शुल्क वसुलीच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:11 AM2021-06-25T04:11:51+5:302021-06-25T04:11:51+5:30
वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार नाशिक: गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडत आहेत. मागील आठवड्यात नाशिक रोडमध्ये, त्यानंतर सिडको, ...
वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनांच्या तोडफोडीचे प्रकार घडत आहेत. मागील आठवड्यात नाशिक रोडमध्ये, त्यानंतर सिडको, इंदिरानगर आणि आता पंचवटी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. अनलॉकनंतर जनजीवन पूर्व पदावर येत असतानाच वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
नाशिक: जून महिन्यात अवकाळी पावसानंतर मृगाच्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पहिल्या पावसानंतर पेरणी झाली असली तरी पुरेसा पाऊस नसल्याने अंकुराला पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
रोजगार मिळत नसल्याने तरुणांची परवड
नाशिक : अनलॉकनंतर जनजीवन पूर्व पदावर येत असले तरी रोजगाराच्या पुरेशा संधी नसल्याने तरुणांची परवड होत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा व्यापाऱ्यांना बंदचा फारसा सामना करावा लागला नाही. काही प्रमाणात व्यवहार सुरळीत सुरू असतानाही रोजगाराच्या बाबतीत कामगारांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे तरुणांना भाजीपाला तसेच अन्य व्यवसायाकडे वळावे लागत आहे.
रूग्ण संख्या वाढत असल्याने चिंता
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांचे प्रमाण आवाक्यात असल्याने निश्चिंत झालेल्या नाशिककरांची पुन्हा चिंता वाढली आहे. शहरातील रूग्णांची संख्या वाढल्यामुळे कोराेना पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा एकदा दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे.
सातपूर येथील केंद्रावर गर्दी
नाशिक: सातपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठी रांग लागत आहे. अठरा वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यास प्रारंभ झाल्यानंतर शहरातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी वाढत आहे. त्यामध्ये सातपूर येथील प्रतिसाद चांगला असल्याचे दिसून येते. लसीकरणासाठी केंद्राच्या परिसरात लांबच लांब रांग लागत आहे.