ग्रामपंचायतींच्या फेररचनेतील हरकतींवर तक्रारींचा पाऊस १३ फेब्रुवारीला होणार अंतिम वॉर्डरचना?
By admin | Published: February 8, 2015 12:32 AM2015-02-08T00:32:45+5:302015-02-08T00:34:23+5:30
ग्रामपंचायतींच्या फेररचनेतील हरकतींवर तक्रारींचा पाऊस १३ फेब्रुवारीला होणार अंतिम वॉर्डरचना?
नाशिक : येत्या जून ते डिसेंबर २०१५ मध्ये होणाऱ्या जिल्'ातील ५१७ ग्रामपंचायतींच्या वॉर्डची अंतिम फेररचना पुढील आठवड्यात होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या कक्षात या ग्रामपंचायत वॉर्ड फेररचनेबाबत तक्रारींची सुनावणी सुरू होती. शुक्रवारी २६, तर शनिवारी २८ अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ९ तारखेला त्यासंदर्भात अंतिम फेररचनेचे आदेश काढण्यात येण्याची शक्यता असून, त्यानंतर दोन-तीन दिवसांत ग्रामपंचायतींची अंतिम वॉर्ड फेररचना होणार आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झालेल्या प्रमुख तक्रारींपैकी लोकसंख्येच्या निकषानुसार मागील वेळी महिला आरक्षण असतानाही यावेळी महिलाच आरक्षण झाले, ते बदलावे. अनुसूचित जाती व जमातीच्या लोकसंख्येनेुसार वॉर्डरचना झालेली नाही, वॉर्डरचनेत महिला आरक्षण वाढले आहे. २०११च्या जनगणनेनुसार वॉर्डरचना व आरक्षण काढण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. २८ जानेवारी रोजी ग्रामपंचायतींची फेररचना जाहीर झाली होती. त्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती व आक्षेप मागविण्यात आले होते. त्याची सुनावणी ६ व ७ फेब्रुवारी रोजी झाली. आता अंतिम वॉर्ड फेररचना पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)