‘मैत्रेय’च्या १५५० गुंतवणुकदारांनी केल्या पोलिसांकडे तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:10 AM2018-11-28T01:10:16+5:302018-11-28T01:11:01+5:30
गुंतवणूदार फसवणूक प्रकरणात मैत्रेय कंपनीतील संचालकांविरोधात गुन्हे दाखल असून पोलीस महासंचालकांनी सनियंत्रण समिती गठीत केली आहे़ त्यानुसार गत तीन दिवसांमध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या एक हजार ३०० ठेवीदारांनी शहर पोलीस आयुक्तालयात, तर मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील २५० गुंतवणूकदारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत.
नाशिक : गुंतवणूदार फसवणूक प्रकरणात मैत्रेय कंपनीतील संचालकांविरोधात गुन्हे दाखल असून पोलीस महासंचालकांनी सनियंत्रण समिती गठीत केली आहे़ त्यानुसार गत तीन दिवसांमध्ये मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या एक हजार ३०० ठेवीदारांनी शहर पोलीस आयुक्तालयात, तर मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील २५० गुंतवणूकदारांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या आहेत. मैत्रेय फसवणूक प्रकरणात पोलिसांनी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल केलेले असून कंपनीची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे़ कंपनीच्या जप्त केलेल्या ३०८ मालमत्ताबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून त्यानंतर गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत केली जाणार आहे़
मैत्रेय कंपनीच्या अनेक उपकंपन्या असून, त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना आपल्या तक्रारी शहर पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे देता येणार आहे़
ठेवीदारांमध्ये संभ्रम
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात मैत्रेय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मैत्री रिअल्टर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्याचे अर्ज स्वीकारले जात असून आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रायव्हेट लिमिटेडचे अर्ज स्वीकारले जात आहेत़ मात्र मैत्रेय सुवर्णसिद्धीचे गुंतवणूकदार शहर पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज घेऊन जात आहेत़